spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

IND vs SA : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा चौथ्या टी २०i सामन्यात 135 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली.

India vs South Africa 4th T20i : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या चौथ्या टी२०i सामन्यांमध्ये टीम इंडियाने १३५ धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेचा ३-१ ने धमाकेदार विजय मिळवला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला २८४ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेला २० ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला १८.२ ओव्हरमध्ये १४८ धावांवर गुंडाळलं. संजू सॅमसन आणि आणि तिलक वर्मा हे दोघे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरला आहे.

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने २० ओव्हरमध्ये १ विकेट गमावून २८३ धावा केल्या. अभिषेक शर्मा ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर संजू आणि तिलक या दोघांनी २१० धावांची नाबाद भागीदारी केली. संजूने ५६ चेंडूत ९ षटकार आणि ६ चौकारांसह नाबाद १०९ धावा केल्या. संजूच्या कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलं. तर तिलकने ४७ बॉलमध्ये १० सिक्स आणि ९ फोरसह नॉट आऊट १२० रन्स केल्या. तिलकचं हे एकूण आणि सलग दुसरं शतक ठरल. तर दक्षिण आफ्रिकेकडून लुथो सिपामला याला एकमेव विकेट मिळाली.

विजयी धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफिकेकडुन ट्रिस्टन स्टब्स ४३, डेव्हिड मिलर ३६, मार्को जान्सेन नॉट आऊट २९ आणि गेराल्ड कोएत्झी याने १२ धावा केल्या. या चौघांव्यतिरिक्त इतर सर्व फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक ३ विकेट्स मिळवल्या. अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्थी या दोघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या, रमनदीप सिंह आणि रवी बिश्नोई या तिघांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss