India Qualify For Semi-Final Champions Trophy : ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या ९ व्या हंगामातील स्पर्धा आता अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे नाव समाविष्ट आहे. टीम इंडियाला स्पर्धेतील शेवटचा ग्रुप स्टेज सामना 2 मार्च रोजी खेळायचा आहे, परंतु त्यांनी आधीच सेमीफायनलसाठी पात्रता मिळवली आहे. या स्पर्धेत आठ टॉप संघ २ गटात विभागले गेले होते. ‘अ’ गटातून भारत आणि न्यूझीलंडच्या सेमीफायनलचं तिकीट पक्क केलं आहे. दोन्ही संघांनी शानदार कामगिरी करत गट फेरी जिंकून पुढील फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आता सर्वांचे लक्ष उपांत्य फेरीकडे आहे, जिथे हे दोन्ही संघ त्यांचे विजेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी मैदानात उतरतील.
चॅम्पियन्स ट्रॉफीत किती सामने होणार?
यंदा या स्पर्धेतील सहभागी 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे.
एका संघामध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश आणि न्यूझीलंड 4 संघ ए गटात आहेत.
दुसऱ्या संघात ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा बी ग्रुपमध्ये समावेश आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘बी’ गटाचा खेळ रंगणार
या गटात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे या गटातून उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघांची नवे अद्याप निश्चित झाली नाही आहेत. मंगळवारी २५ फेब्रुवारी २०२५ म्हणजे आज दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया असा सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत पोहोचणार असून ‘बी’ गटातला हा पहिला संघ ठरेल. त्याच वेळी इंग्लंड आणि अफगाणिस्तानचा पराभवाचा सामना ठरेल. अशा परिस्थितीत, हे चारही संघ सध्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत दिसणार आहेत.