India vs New Zealand CT 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात टीम भारताची जुगलबंदी न्यूझीलंडविरुद्ध पडणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे. न्यूझीलंड आणि भारत या दोन्ही संघांचा हा तिसरा आणि अंतिम सामना असून दोन्ही संघांनी सलग २ सामने जिंकून उपांत्य फेरीत आधीच प्रवेश मिळवला आहे. हा सामना रविवारी २ मार्चला होणार आहे. सामना जिंकून ए ग्रुपमधून नंबर १ होण्यासाठी दोन्ही संघांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. त्याबरोबरच उपांत्य फेरीच्या दृष्टीने हा सामना खूपचं महत्वाचा असणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘अ’ गटातील हा शेवटचा सामना असेल. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचले असले तरी या सामन्यातील निर्णयावर कोणता संघ पहिला उपांत्य फेरी सामना खेळणार आणि कोणता संघ दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळणार हे ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघ आपल्या पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहेत. भारत आणि न्यूझीलंडचे ४-४ गुण आहेत पण चांगल्या नेट रन रेटमुळे, न्यूझीलंड ग्रुप ‘अ’ च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये एकमेकांविरुद्ध ११८ सामने खेळले आहेत. यामध्ये भारताचा वरचष्मा आहे. भारताने ६० वेळा तर न्यूझीलंडने ५० वेळा विजय मिळवला आहे.
भारत कोणाला नवी संधी देणार?
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडकडे पाच डावखुरे फलंदाज असल्याने आणि मोहम्मद शमीला दुखापत झाली असल्याने, भारतीय संघ व्यवस्थापन या अनुभवी वेगवान गोलंदाजाला विश्रांती देऊन अर्शदीप सिंगला संधी देऊ शकते. त्यातच भारत संघाचं सेमी फायनलमधील स्थान सुनिश्चित असल्याने भारतीय चाहत्यांना चिंता नाही. मात्र भारताची न्यूझीलंडविरुद्धची आकडेवारी पाहिली तर चाहत्यांची चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही. भारताची न्यूझीलंडविरुद्धची आकडेवारीच तशी आहे. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यं इतर संघांवर विजय मिळवला आहे. मात्र भारताला आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध एकदाही विजय मिळवता आलेला नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ भारत संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ न्यूझीलंड संघ :
मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.
हे ही वाचा :
Bank Holidays in April 2023, एप्रिल महिन्यात बँका तब्बल १५ दिवस बंद, जाणून घ्या सुट्ट्याची यादी
Chaitra Navratri Sabudana Kheer Recipe, उपवास आहे? तर घरच्या घरी बनवा साबुदाणा खीर