Sunday, March 17, 2024

Latest Posts

भारतीय क्रिकेट संघाची नवी जर्सी, काय म्हणाले Adidas इंडियाचे GM

भारतीय क्रिकेट संघाची नवी जर्सी भारताने एक जून रोजी जाहीर केली आहे कंपनीने मे महिन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळशी पाच वर्षाचा करार केला.

भारतीय क्रिकेट संघाची नवी जर्सी भारताने एक जून रोजी जाहीर केली आहे कंपनीने मे महिन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळशी पाच वर्षाचा करार केला. भारतीय संघाचे अधिकृत किट प्रयोजक बनले इंस्टाग्राम वर जारी केलेले व्हिडिओमध्ये एडिडास इंडिया इंडियाने टी -२०, ओडीआय आणि कसोटी क्रिकेट या तीनही फॉरमॅटसाठी नवीन जर्सी प्रदर्शित करण्यात आली आहे. Adidas ची नवीन जर्सी अशा वेळी आली आहे जेव्हा टीम इंडियाला 2023 मध्ये काही महत्त्वपूर्ण असाइनमेंट्स पूर्ण करायच्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by adidas India (@adidasindia)

पुढच्या आठवड्यात ७ जूनपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरु होणार आहे त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये आशिया चषक आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळवण्यात येणार आहेत. त्यांनतर Adidas India चे GM, नीलेंद्र सिंग यांनी त्याची प्रतिक्रिया शेयर केली आणि ते म्हणाले की, आमच्या खेळाडूंसाठी उच्च दर्जाची कामगिरी उत्पादने देऊन क्रिकेट जगासमोर सादर करण्याचा हा आमचा क्षण आहे.

आम्ही भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळाद्वारे आमच्या ग्राहकांसोबत क्षण निर्माण करण्यास उत्सुक आहोत. Adidas चा भारतातील क्रिकेटच्या क्षमतेवर खरोखर विश्वास आहे आणि BCCI सोबतच्या या भागीदारीद्वारे आम्ही विकासाला गती देऊ असे ते म्हणाले. त्याचबरोबर Adidas ने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर नवी जर्सी सादर केली आहे.

हे ही वाचा:

SSC 10th Result 2023, यंदा इयत्ता दहावीचा राज्याचा निकाल लागला 93.83 टक्के

Sharad Pawar – Eknath Shinde यांच्या भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

शिवराज्याभिषेक दिनानिम्मित Raj Thackeray यांनी केली पोस्ट शेअर, माझी एक तीव्र इच्छा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss