spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

क्रिकेटप्रेमींचा भ्रमनिरास! रोहित विराटच्या खेळीमुळे केला संताप व्यक्त…

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ३४० धावांचं आव्हान ठेवलं आहे. हे आव्हान गाठताना भारताच्या दिग्गज खेळाडूंनी नांगी टाकली आहे. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा ही जोडी मैदानात आली होती. रोहित शर्मा या सामन्यात काहीतरी करेल अशी अपेक्षा होती. पण पुन्हा एकदा क्रीडाप्रेमींचा भ्रमनिरास झाला. रोहित शर्माला काही खास करता आलं नाही. ४० चेंडूत ९ धावा केल्या आणि पॅट कमिन्सचा शिकार झाला. त्यामुळे क्रीडाप्रेमींना डोक्यावर हात मारण्याशिवाय पर्याय नव्हता. केएल राहुलला खातंही खोलता आलं नाही. चार चेंडूचा सामना केला आणि पाचव्या चेंडूवर पॅट कमिन्सला विकेट देऊन आला. त्यामुळे भारतावर दबाव वाढला. विराट कोहली यशस्वी जयस्वालला साथ देईल असं वाटत होतं. त्याचा अनुभव पाहता त्याची टीम इंडियाला मदत होईल असं वाटत होतं. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर पुन्हा एकदा फेल गेला. २९ चेंडूत ५ धावा करून स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला.

तीन दिग्गज खेळाडू झटपट बाद झाल्याने टीम इंडियावरील टेन्शन वाढलं आहे. हा सामना महत्त्वाचा असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने निदान ड्रॉ करणं महत्त्वाचं आहे. असं असताना अशा सामन्यातील खेळी पाहून क्रीडाप्रेमींचा संताप झाला आहे. दुसरीकडे, यशस्वी जयस्वालने चांगला तग धरला आहे. अर्धशतकी खेळी करत पाचव्या दिवसाचा वेळ काढण्याचा केविळवाणा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आडमतेडम खेळणारा ऋषभ पंत सुनील गावस्कर यांनी फटकारल्यानंतर काही अंशी सरळ खेळताना दिसत आहे. आता भारतीय क्रीडाप्रेमी देव पाण्यात बुडवून बसले आहे. निदान सामना ड्रॉ व्हावा अशी प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेने आपलं स्थान पक्कं केलं आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यापैकी एका संघाची अंतिम फेरीत वर्णी लागणार आहे. पण भारताचं गणित खूपच कठीण दिसत आहे. त्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध शेवटच्या सामन्यात होम ग्राउंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या पुढच्या मालिकेचा आधार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात अंतिम फेरीचा सामना होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss