Friday, March 29, 2024

Latest Posts

IPL 2023 Final, आज रंगणार महामुकाबलाचा थरार… कोण पटकवणार IPL 2023 मान? जाणून घ्या सविस्तर माहिती

आज दिनांक २८ मे रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या हंगामातील अंतिम फेरीचा थरार हा सर्वांना पाहायला मिळणार आहे.

GT vs CSK, IPL 2023 Final : आज दिनांक २८ मे रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या हंगामातील अंतिम फेरीचा थरार हा सर्वांना पाहायला मिळणार आहे. ३१ मार्च २०२३ पासून सुरू झालेल्या या इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या हंगामातील अंतिम फेरीचा थरार आज पाहायला मिळणार आहे. 31 मार्च रोजी सुरु झालेल्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील आज अंतिम सामना रंगणार आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमाचा आता विजेता कोण ठरणार याची सर्वांना उत्सुकता ही लागली आहे.

आज दिनांक २८ मे २०२३ रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोंदी स्टेडिअमवर संध्याकाळी ७.३० वाजता चेन्नई आणि गुजरात या दोघांमध्ये महामुकाबला पाहायला मिळणार आहे. तसेच दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स या टीमने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि अंतिम फेरीत मजल मारली आहे. आता अंतिम सामन्यात गुजरात टायटन्ससमोर महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान असेल. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत चार वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये गुजरातने ३ तर चेन्नईने केवळ एक सामना जिंकला आहे. २०२३ चा IPL चा पहिला लीग सामना चेन्नई आणि गुजरात यांच्यात खेळला गेला होता, ज्यामध्ये गुजरातने ५ विकेट्सने विजय मिळवला होता.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) ‘जिओ सिनेमा’ ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

चेन्नईची संभावित प्लेईंग 11 : 

ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोइन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कप्तान और विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्ष्णा

गुजरात टायटन्स संभावित प्लेईंग 11 :

वृद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

Gujrat Titans ला मिळवून दिले शुभमन गिल आणि मोहित शर्माने अंतिम फेरीचे तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss