spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

IPL 2025: आयपीएल सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसण्याची शक्यता; नक्की वाचा

Mumbai Indians Squad Updates: इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होणार आहे. परंतु त्याआधीच संघांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे आणि यात मुंबई इंडियन्सचा देखील समावेष आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज लिझाड विल्यम्स दुखापतीमुळे आगामी हंगामातून बाहेर पडला आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात विल्यम्स दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता, मात्र यंदा त्याला मुंबईने खरेदी केले होते. विल्यम्स बाहेर पडल्याने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.

इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या दिल्ली कॅपिटल्सला देखील असा मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रूकने सलग दुसऱ्या सत्रात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, त्याला जगातील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी लीगमधून दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागू शकते. मात्र, याबाबत आयपीएलकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. नोव्हेंबरमध्ये झालेल्या मेगा लिलावात ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सने ६.२५ कोटी रुपयांना संघात सामील केले होते. ब्रूकने राष्ट्रीय संघाच्या त्याच्या वचनबद्धतेचे कारण सांगत त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

त्याचबरोबर टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापत झाल्यामुळे क्रिकेटपासून दूर आहे. तो आतासारवाला लागला असला तरीही आयपीएलच्या पहिल्या आठवड्यामध्ये खेळेल की नाही याबाबत सांशकता आहे. कारण बुमराह अजूनही पुर्णपण तंदरूस्त नसल्यामुळे तो थेट एप्रिलमध्येच मुंबई इंडियन्ससच्या टीमसोबत जोडला जाण्याची शक्यता आहे.यॉर्कर किंग बुमराह सुरूवातीचे सामने खेळणार नाही. मात्र यंदाच्या सीझनध्ये मुंबईचा पहिला सामना सीएसकेसोबत असणार आहे.

हे ही वाचा : 

Bank Holidays in April 2023, एप्रिल महिन्यात बँका तब्बल १५ दिवस बंद, जाणून घ्या सुट्ट्याची यादी

Chaitra Navratri Sabudana Kheer Recipe, उपवास आहे? तर घरच्या घरी बनवा साबुदाणा खीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss