Thursday, March 28, 2024

Latest Posts

IPL2023, Orange cap आणि purple cap च्या शर्यतीत एका सामन्यामुळे झाला फेरबदल

इंडियन प्रीमियर लीग २०२३ (2023 Indian Premier League) चा हा हंगाम अत्यंत रोमांचक होत चालला आहे. आयपीएलचा या हंगामाचा हा शेवटचा टप्पा सुरु आहे.

इंडियन प्रीमियर लीग २०२३ (2023 Indian Premier League) चा हा हंगाम अत्यंत रोमांचक होत चालला आहे. आयपीएलचा या हंगामाचा हा शेवटचा टप्पा सुरु आहे. आयपीएलचे चाहते आणि क्रिकेट चाहते नेहमीचे आयपीएलमधील आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट तर करत असतातच त्याचबरोबर आपल्या आवडत्या संघाचा विजय पराजयाकडे सुद्धा चाहत्यांचे लक्ष लागलेले असते त्याचबरोबर कोणता खेळाडू सर्वाधिक धावा करतो कोणता खेळाडू सर्वाधिक विकेट्स घेतो याकडे सुद्धा त्यांचे लक्ष असते. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप (Orange cap) दिली जाते आणि सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप (Purple Cap) दिली जाते. सध्या कोणत्या खेळाडूंकडे कोणती कॅप आहे आणि कोणते खेळाडू ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत आहेत ते पाहूया.

सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगरुळूचा कर्णधार फाफ डू प्लेसीकडे ऑरेंज कॅप कायम आहे. फाफ डू प्लेसीने आतापर्यत १३ सामन्यांमध्ये ७०२ धावा करून ऑरेंज कॅपवर आपले वर्चस्व गाजवले आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने १३ सामन्यांमध्ये ५७६ धावा केल्या आहेत. तर राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जैस्वाल तिसऱ्या क्रमांकावर आहे. यशस्वीने आतापर्यत एकूण १३ सामने खेळले आहेत त्यामध्ये त्याने ५७५ धावा केल्या आहेत. कालचा पार पडलेला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यामध्ये आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने दमदार कामगिरी करून या सीझनचे पहिले शतक केले आहे आणि आता त्याने ऑरेंज कॅपच्या लढतीत सहाव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर उडी मारली आहे. विराटने १३ सामन्यामध्ये ५३८ धावा केल्या आहेत. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स फलंदाज डेव्हिड कॉनवे पाचव्या क्रमांकावर आहे. डेव्हिड कॉनवेने १३ सामन्यांमध्ये ४९८ धावा केल्या आहेत.

आयपीएल मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते या शर्यतीत अव्वल स्थानावर गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आता पर्यत १३ सामन्यांमध्ये २३ विकेट्स घेतले आहेत. त्याचा सहकारी गुजरात टायटन्सचा फिरकी गोलंदाज राशिद खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. राशिदने आतार्पयत २३ गडी बाद करण्यात यश मिळाले आहे. राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने २१ विकेट्स घेतले आहेत आणि तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर मुंबई इंडिअन्सचा गोलंदाज पियुष चावला चौथ्या क्रमांकावर आहे तर कोलकाता नाइट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती पाचव्या क्रमांकावर आहे. पियुष चावलाने २० विकेट्स घेतले आहेत आणि वरुण चक्रवर्तीने १९ गडी बाद केले आहेत. आयपीएलचा शेवटचा टप्पा सुरु आहे आणि कोणता खेळाडू इंडियन प्रीमियर लीग २०२३ पर्पल कॅपवर आणि ऑरेंज कॅपवर नाव करेल या कडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss