Saturday, June 3, 2023

Latest Posts

IPL2023, कोण ठरणार वरचढ? मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स

आज आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Mumbai Indians vs Gujarat Titans) या दोन संघांमध्ये खेळाला जाणार आहे.

आज आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Mumbai Indians vs Gujarat Titans) या दोन संघांमध्ये खेळाला जाणार आहे. आजचा हा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) होणार आहे. आज मुंबईचा संघ पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने मैदानामध्ये उतरेल अशी अपेक्षा आहे. गुजरात संघाने आयपीएल २०२३ मध्ये अहमदाबादमध्ये मुंबईला ५७ धावांनी हरवले होते. याच पराभवाचा बदल घेण्यासाठी रोहित शर्मा आज सज्ज झाला आहे. गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर मुंबई इंडियन्स चा संघ मागील सामन्यामध्ये आरसीबीचा पराभव करत टॉप चार मध्ये स्थान पटकावले आहे. आजच्या सामन्यांमध्ये सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज जर गुजरात टायटन्सचा संघ विजयी झाला तर त्यांचा प्लेऑफ मध्ये जातील. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आतापर्यत २ सामने खेळवले गेले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांनी प्रत्येकी १-१ सामना जिंकला आहे. आकड्याची लढाई बरोबरीत आहे. सोळाव्या सीझनमधील अखेरच्या टप्प्यामध्ये मुंबईने दमदार कामगिरी केली आहे. मागील चार सामन्यामध्ये मुंबईने तीन विजय धावांचा पाठलाग करुन मिळवले आहेत

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग ११
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर) , सूर्यकुमार यादव, नेहाल वधेरा, तिलक वर्मा, कॅमरून ग्रीन, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, पियुष चावला, जेसन बेहरनडॉर्फ, कुमार कार्तिकेय

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेईंग ११
शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार ), डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss