Jasprit Bumrah : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने आधीच स्थान मिळवले आहे. त्यातच गट टप्प्यात अजूनही एक सामना बाकी असून तो सामना २ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाईल. भारतीय संघाला 4 मार्च रोजी दुबईमध्ये उपांत्य फेरीचा सामना खेळाला जाणार आहे. जसप्रीत बुमराह सेमीफायनलपूर्वी टीम इंडियामधून खेळणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. त्याचबरोबर आता सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारतीय चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी देत एक व्हिडियो सोशल मीडियावर शेयर केला आहे.
बुमराहची टीम इंडियात होणार एन्ट्री?
बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजे NCA मध्ये त्याने गोलंदाजीचा सराव सुरु केलाय. बुमराहने त्याचा एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय. या व्हिडिओवरुन सेमीफायनलआधी त्याचा टीम इंडियात समावेश होणार का? अशी चर्चा सुरु झालीय. पाठिच्या दुखण्यामुळे जसप्रीत बुमराहचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या टीममध्ये समावेश करण्यात आला नाही. स्कॅनचा रिपोर्ट समोर आल्यानंतर त्याला NCA मध्ये पाठवण्यात आलं. तिथे बीसीसीआयच्या मेडीकल टीमच्या देखरेखीखाली त्याचं रिहॅब सुरु आहे. जवळपास एक महिन्यापासून मैदानापासून दूर असलेल्या बुमराहने आता गोलंदाजी सुरु केली असून मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलसाठी टीममध्ये जसप्रीत बुमराहचा समावेश होणं कठीण दिसतय. कारण या मॅचला आता फक्त चार दिवस बाकी आहेत. बीसीसीआयकडूनही या बद्दल कुठलीही माहिती समोर आलेली नाही. रिपोर्टनुसार 22 मार्च पासून सुरु होणाऱ्या आयपीएल ट्रॉफीपासून तो टीममध्ये कमबॅक करु शकतो.
चाहत्यांचा आनंद गगनात मावेना
जसप्रीत बुमराह व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते खूप आनंदी आहेत. ते खूप उत्सुक असल्याचं दिसत आहेत. बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळवण्याची मागणी करत असून काहींना तो उपांत्य फेरीत तर काहींना अंतिम फेरीत खेळताना पहायचे आहे. म्हणूनच चाहत्यांनी बुमराहच्या व्हिडिओवर कमेंट करून ही मागणीही केली आहे. पण भारताचा हा स्टार वेगवान गोलंदाज लवकरच शानदार पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.
हे ही वाचा:
Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन
Follow Us