Thursday, March 28, 2024

Latest Posts

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

आयपीएल २०२३ (IPL 2023) चा सिझन संपल्यानंतर टीम इंडियामध्ये (Team India) काही बदल पाहायला मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमधील गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) टीम इंडिया T-२० (T-20) नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

आयपीएल २०२३ (IPL 2023) चा सिझन संपल्यानंतर टीम इंडियामध्ये (Team India) काही बदल पाहायला मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमधील गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) टीम इंडिया T-२० (T-20) नेतृत्व सोपवण्यात आले आहे. आयपीएल २०२३ नंतर होणाऱ्या वन डे मालिकेमध्ये हार्दिक पांड्या नेतृत्व करताना दिसणार आहे. आयपीएलचा सिझन संपल्यानंतर अफगाणिस्तान विरुद्धच्या तीन वन डे सामने होणार आहेत. यामध्ये रोहित शर्मा (Rohit sharma), विराट कोहली (Virat Kohli), मोहम्मद शमी (Mohammed Shami) व मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)यांना विश्रांती देण्याचा विचार सुरू आहे.

टीम इंडियाचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे त्यामुळे सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्धच्या तीन वन डे सामन्यामध्ये दुसऱ्या खेळाडूंना मैदानावर उतरवण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या तारखा अजुनपर्यत जाहीर करण्यात आल्या नाहीत. व हे सामने जून महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये खेळवण्यात येणार आहेत. दोन महिन्यांपासून भारतातील क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळत आहेत आणि त्यानंतर ७ जून ते ११ जून यादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची मालिका खेळवण्यात येणार आहे.

जुलै महिन्यामध्ये भारताचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्याव असणार आहेत. तेव्हा भारताचे संघ तीनही फॉरमॅटचे समाने खेळणार आहे. १२ जुलै ते १३ ऑगस्ट कालावधीमध्ये दोन कसोटी, इन वन डे आणि T-२० सामन्यांच्या मालिका खेळल्या जाणार आहेत. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आयर्लंड विरुद्धची तीन T-२० सामान्यांची मालिका खेळवण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss