Thursday, November 30, 2023

Latest Posts

Lionel Messi: पुन्हा एकदा पुरस्काराची बाजी, Football विश्वात विक्रम

फुटबॉल जगतातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तींना दिला जाणारा बॅलन डी'ओर अवॉर्ड फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीने (Lionel Messi) आठव्यांदा पटकावला आहे.

जगभरात अनेक चाहते असलेला प्रसिद्ध फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी (Lionel Messi) याने त्याच्या नावावर आणखी एक विक्रम केला आहे. मेस्सीने विक्रमी ८ वेळा फुटबॉल जगतातील बॅलन डी’ओर अवॉर्ड पटकावला आहे. मेस्सीच्या या विक्रमामुळे जगभरातील त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. यासोबतच, सर्वांकडून त्याचे कौतुकही केले जात आहे. लियोनेल मेस्सीसाठी (Lionel Messi) या वर्षीचा बॅलन डी’ओर अवॉर्ड जिंकणे कठीण होते. बॅलन डी’ओर अवॉर्डच्या स्पर्धेत मेस्सीसमोर मँचेस्टर सिटीच्या एर्लिंग हॅलँडचं आव्हान होत. एर्लिंग हॅलँडने मागच्यावेळी तिहेरी किताब जिंकला होता. पण यावर्षी मात्र मेस्सीने विक्रमाची बाजी जिंकली आहे.

 बॅलन डी’ओर जिंकणारा मेस्सी पहिला खेळाडू ठरला आहे. इंटर मियामीचे सर्वेसर्वा आणि फुटबॉलविश्वातील दिग्गज डेव्हिड बॅकहॅम यांच्या हस्ते मेस्सीला त्याच्या कारकिर्दीतील आठवा बॅलन डी’ओर अवॉर्ड देण्यात आला. ३१ ऑक्टोबर २०२३ अर्थात सोमवारी पॅरिसमधील थिएटर डू शॅटलेटमध्ये रंगलेल्या सोहळ्यात मेस्सीला बॅलन डी’ओर अवॉर्डने गौरवण्यात आले. मेस्सीने यापूर्वी २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५, २०१९ आणि २०२१ या वर्षांमध्ये बॅलन डी’ओर अवॉर्ड जिंकला आहे. अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीनं सोमवारी विक्रमी आठवा बॅलोन डी’ओरचा खिताब जिंकला आणि फुटबॉलच्या इतिहासात आपलय नावाची विक्रमी नोंद केली आहे. दरम्यान, मँचेस्टर सिटीचा स्टार एर्लिंग हॅलँड मेस्सीनंतर दुसऱ्या स्थानावर आहे, तर मेस्सीचा पीएसजीचा माजी सहकारी किलियन एमबाप्पे तिसऱ्या स्थानावर आहे. एटाना बोनामतीनं महिलांचा बॅलोन डी’ओर जिंकून स्पेनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तसेच, आठव्या बॅलन डीमध्ये एमी मार्टिनेजनं वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलकीपरसाठीची याचिन ट्रॉफी जिंकली.

फुटबॉल जगतातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तींना दिला जाणारा बॅलन डी’ओर अवॉर्ड फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीने (Lionel Messi) आठव्यांदा पटकावला आहे. हा वैयक्तिक खेळाडूला दिला जाणारा सन्मान आहे, ज्यात मेस्सीने प्रत्येक वेळेसारखी यावर्षी देखील बाजी मारली आहे. फुलबॉलपटूंच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे फुटबॉल क्लब आणि राष्ट्रीय संघातील खेळाडूला दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

हे ही वाचा : 

KOLHAPUR: केंद्र सरकारकडून मधाच्या गावाची पर्यटनाच्या यादीत नोंद

अभिनेता रितेश देशमुखने दिला मनोज जरंगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणाला…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss