Tuesday, June 6, 2023

Latest Posts

पाहा रवी शास्त्रींची प्लेइंग ११, या खेळाडूंना टीममध्ये घेणे टाळले

आयपीएल २०२३ (IPL 2023) चा सिझन संपल्यानांतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनीशप फायनलसाठी (World Test Championship Final) भारताचा संघ लंडनला रवाना होणार आहे.

आयपीएल २०२३ (IPL 2023) चा सिझन संपल्यानांतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनीशप फायनलसाठी (World Test Championship Final) भारताचा संघ लंडनला रवाना होणार आहे. भारताचा संघ ऑस्ट्रेलिया विरोधात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनीशप फायनल खेळणार आहे. या फायनल सामन्याचे आयोजन लंडनमध्ये द केनिंग्टन ओव्हलमध्ये करण्यात आले आहे. सर्व खेळाडू ३० मे पर्यत लंडनमध्ये रवाना होणार आहेत. या सामन्यांचे आयोजन ७ जून ते ११ जून या दरम्यान करण्यात आले आहे. भारताच्या संघाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनीशप फायनलची ही दुसरी वेळ आहे. याआधी भारताच्या संघाला २०२१ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनीशप फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

२०२१ मध्ये भारताच्या संघाच त्यावेळी स्वप्न अपूर्ण राहिले होते. पण आता भारताचा संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनीशप फायनलचे प्लेइंग ११ खेळाडू घोषित करण्यात आले आहेत. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्हीही संघांमधील खेळाडूं निवडून प्लेइंग इलेव्हन तयार केली आहे. रवी शास्त्री यांचे बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताच्या टीम पेक्षा जास्त ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. रवी शास्त्री प्लेइंग इलेव्हमध्ये भारताचे ४ तर ऑस्ट्रेलियाचे ७ खेळाडू आहेत.

 

रवि शास्त्री यांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमधून शुबमन गिल, मोहम्मद सिराज, टॉड मर्फी, डेविड वॉर्नर, कॅमरून ग्रीन, उमेश यादव, ट्रेव्हिस हेड आणि रविचंद्रन अश्विन यांना टाळले आहे.

रवि शास्त्री यांची प्लेइंग ११ –
रोहित शर्मा (कप्तान), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, विराट कोहली, स्टीव्हन स्मिथ, रविंद्र जडेजा, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि मोहम्मद शमी

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss