Saturday, June 3, 2023

Latest Posts

LSG vs KKR, कोण मारणार बाजी? लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

आयपीएल २०२३ (IPL 2023) चा आजचा (२० मे) दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants) यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे.

आयपीएल २०२३ (IPL 2023) चा आजचा (२० मे) दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants) यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. आजचा हा सामना ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या त्यांच्या खेळामध्ये कोलकाता शहर आणि फुटबॉलच्या दिग्गजांना श्रद्धांजली म्हणून मोहन बागानची खास जर्सी परिधान करणार आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आजचा सामना प्लेऑफच्या शर्यतीत जिवंत राहण्यासाठी लढणार आहेत. गुणतालिकेमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघाचे १४ गुण आहेत आणि हे दोन्ही संघ एक एक सामना खेळणार आहेत.

यंदाचा हा सिझन कोलकाता नाइट रायडर्ससाठी चांगला नव्हता. क्रुणाल पंड्या, नियमित कर्णधार केएल राहुलच्या अनुपस्थितीत लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत आहे आणि त्याच्या नेतृत्व कौशल्याची झलक मुंबई इंडियन्स विरुद्धच्या त्यांच्या शेवटच्या सामन्यात दिसून आली, जिथे संघाने १७७ धावांचा यशस्वी बचाव केला. आजच्या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्स कोलकाता नाइट रायडर्सशी भिडणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फायदा फलंदाजांसाठी होणार आहे.

 

कोलकाता नाइट रायडर्सची संभाव्य प्लेइंग ११
रहमानउल्ला गुरबाज, जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (क), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती

लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग ११
क्विंटन डी कॉक, काइल मेयर्स, दीपक हुडा, प्रेरक मंकड, क्रुणाल पंड्या (क), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss