Thursday, April 25, 2024

Latest Posts

मराठी पोरांचा Chennai Super Kings च्या विजयात मानाचा वाटा

काल इंडियन प्रीमियर लीग २०२३ (Indian Premier League 2023) चा महासंग्राम पार पडला. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Chennai Super Kings vs Gujarat Titans) या दोन संघांमध्ये कालचा आयपीएल २०२३ ची लढत पाहायला मिळाली.

काल इंडियन प्रीमियर लीग २०२३ (Indian Premier League 2023) चा महासंग्राम पार पडला. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Chennai Super Kings vs Gujarat Titans) या दोन संघांमध्ये कालचा आयपीएल २०२३ ची लढत पाहायला मिळाली. कालच्याया चेन्नईच्या विजयामध्ये तीन महाराष्ट्रातील मराठमोळ्या पोरांचा मानाचा वाटा आहे असे म्हणणे दांडगे ठरणार नाही. सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाडने (Rituraj Gaikwad) या सिझमध्ये दमदार कामगिरी केली आहे. ऋतुराजने १५ सामन्यांमध्ये ५६४ धावा केल्या आहेत. त्याने चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफमध्ये त्याचबरोबर आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यामध्ये सुद्धा उत्तम कामगिरी करून दाखवली आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज आणि मुळचा महाराष्ट्र पठ्या तुषार देशपांडेचे Tushar Deshpande) हे वर्ष खास होते आणि त्याने त्याच्या संघासाठी उत्तम कामगिरी देखील केली. तुषारने त्याच्या संघासाठी १६ सामान्यांमध्ये २१ विकेट्स घेऊन त्याच्या संघाला विजय मिळवून दिला आहे. तुषार देशपांडे याने इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या या सीझनमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यानंतर तिसरा खेळाडू म्हणजेच अनुभवी खेळाडू अजिंक्य राहणे (Ajinkya Rahane). अजिंक्य राहणेने चेन्नई सुपर किंग्सच्या संघांसाठी दमदार कामगिरी केली आहे.

अजिंक्य राहणेने त्याची बॅट या सीझनमध्ये चालवली आहे. त्याने १४ सामन्यांमध्ये ३२६ धावा करत ट्रॉफीवर त्याचा मानाचा वाट आहे. अजिंक्यला बराच वेळ त्याला टीम इंडियामध्ये जागा मिळाली नव्हती परंतु त्यांच्या आयपीएलमधील उत्तम कामगिरीमुळे त्याला भारताच्या संघांमध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर राहाणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुद्धा खेळणार आहे. लवकरच शुभमन गिल, रवींद्र जडेजा, अजिंक्य राहणे हे इंग्लंडला रवाना होणार आहेत.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

“आदिपुरुष” चित्रपटातील गाणे झाले रिलीज, प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss