Sunday, December 3, 2023

Latest Posts

मास्टर ब्लास्टर सचिनच्या पुतळ्याचं मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये अनावरण

मास्टर ब्लास्टर सचिनच्या पुतळ्याचं मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये अनावरण

भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede stadium) पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. हा पुतळा तब्ब्ल २२ फुटांचा असून सचिन तेंडुलकर स्वतः यावेळी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होता.

क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या भारतरत्न, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे,या पुतळ्याचं अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. वानखेडे च्या ‘एमसीए’ लाउंजमध्ये हा सोहळा पार पडला असून या कार्यक्रमाला बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह, बीसीसीआय कोषाध्यक्ष आशिष शेलार तसेच एमसीएचे(MCA) अध्यक्ष अमोल काळे देखील उपस्थित होते, नवीन खेळाडूंना हा पुतळा पाहून प्रेरणा मिळावी आणि त्यांनी चांगली कामगिरी करावी यासाठी या पुतळा उभारण्यात आलेला आहे. सचिनने वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचे अनेक विक्रम आपल्या नावावर कोरले आहेत.

सचिनच्या करिअरमधील शेवटची कसोटी देखील वानखेडे वरच

२०१३ साली सचिनने वानखेडे स्टेडियमवर त्याच्या क्रिकेट करिअर मधील अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. वानखेडे मैदानावरच २०११ साली वन डे (One day )मधील दुसरा वर्ल्ड कप जिंकला होता.त्यावेळी सचिनला खेळाडूंनी खांद्यावर घेत संपूर्ण मैदानात फेरी मारली होती. तो क्षण भारतीयांसाठी आणि सचिनच्या चाहत्यांसाठी अनोखा आणि अविस्मरणीय क्षण होता. सचिनला क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाते, सचिनने दोन दशकांहून अधिक काळ क्रिकेटवर स्वतःचे अधिराज्य गाजवले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकाचं शतक करण्याचा पराक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने वनडेमध्ये एकूण १८ हजारांपेक्षा जास्त धावा काढल्यात. तर कसोटीत १५९२१ धावा त्याच्या नावावर आहेत.

हे ही वाचा : 

ललित पाटीलला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, ‘या’ भागात असेल पाणीपुरवठा बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss