Sunday, June 4, 2023

Latest Posts

MI vs GT, कोणाला मिळणार क्वालिफायर २ चे तिकीट, हार्दिक पांड्या रोहित शर्मा आमनेसामने

आयपीएल २०२३ (IPL2023) च्या ट्रॉफीची लढत दमदार सुरु आहे. क्वालिफायर १ (Qualifier 1) चा सामना पार पडला त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) पराभवाची धूळ चारून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे.

आयपीएल २०२३ (IPL2023) च्या ट्रॉफीची लढत दमदार सुरु आहे. क्वालिफायर १ (Qualifier 1) चा सामना पार पडला त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) पराभवाची धूळ चारून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. कालचा पार पडलेला एलिमिनेटर सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यामध्ये लखनौचे सर्व गडी बाद करून मुंबई इंडियन्स ने दणदणीत विजय मिळवला आहे आणि क्वालिफायर २ मध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. खेळवण्यात आलेला क्वालिफायर १ चा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यामध्ये पराभूत झालेल्या गुजरातला क्वालिफायर २ चा सामना खेळून अंतिम फेरीमध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघ सनराइजर्स हैदराबादच्या संघाला पराभूत करून प्लेऑफ मध्ये जागा मिळवली. त्यांनतर कालच्या एलिमिनेटर सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला पराभूत करून क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. कालच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला. एलिमिनेटर सामन्यामध्ये विजयी झालेला मुंबई इंडियन्सचा संघ क्वालिफायर २ चा सामना खेळणार आहे आणि पराभूत झालेला लखनौ सुपर जायंट्सचा संघ ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.

२६ मे रोजी होणार क्वालिफायर २ चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये रंगणार आहे. यामध्ये कोणता संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. गुजरातच्या संघाने या सिझनमध्ये दमदार कामगिरी केली आहे परंतु मुंबई इंडियन्सचे सुरुवातीचे काही सामने फार काही खास नव्हते. परंतु मुंबई कमबॅक करून प्लेऑफ मध्ये प्रवेश मिळवला. कोणता संघ क्वालिफायर २ चा सामना जिंकून चेन्नई सुपर किंग्स समोर आव्हान उभे करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणता संघ या वर्षांमध्ये आयपीएल २०२३ ची ट्रॉफी मिळवेल याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss