Saturday, June 3, 2023

Latest Posts

MI vs GT, फायनलचे तिकीट कोणाला मिळणार? मुंबई की गुजरात

इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा (Indian Premier League 2023) हा सिझन अत्यंत रोमांचक ठरला आहे. या सीझनमधील सामने हे शेवटच्या चेंडुपर्यत गेले आहेत.

इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा (Indian Premier League 2023) हा सिझन अत्यंत रोमांचक ठरला आहे. या सीझनमधील सामने हे शेवटच्या चेंडुपर्यत गेले आहेत. आयपीएल (IPL) या वर्षीचा हा सिझन शेवटच्या टप्प्यात आहे. आज आयपीएल २०२३ मध्ये क्वालिफायर २ चा सामना पार पडणार आहे. क्वालिफायर १ मध्ये पराभूत झालेला गुजरात टायटन्सचा Gujarat Titans) संघ आणि एलिमिनेटर (Eliminator) सामन्यामध्ये विजयी झालेला संघ हा दोन संघांमध्ये आजचा सामना रंगणार आहे. आजचा हा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे. आज संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना होणार आहे. आजचा हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.

क्वालिफायर १ (Qualifier 1) मध्ये विजयी झालेला चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. आजचा सामना जिंकून अंतिम फेरीचे तिकीट कोणाला मिळणार आहे याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आजच्या सामना जिंकणारा संघ आयपीएल २०२३ च्या फायनमध्ये चेन्नई संघासमोर आव्हान उभे करेल. आयपीएल फायनल सामन्याच्या तिकीटासाठी गुजरात आणि मुंबई दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. पाच वेळा विजेतेपद जिंकणारा आणि मागील वर्षांचा गतविजेता संघ अंतिम फेरीपासून एकच पाऊल दूर आहे. आजचा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघ जिंकण्याच्याच हेतूने मैदानामध्ये उतरतील. कारण आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss