Saturday, April 20, 2024

Latest Posts

MS Dhoni ने दिले त्याच्या चाहत्यांना गिफ्ट, आणखी एक सीझनमध्ये दिसणार कॅप्टन कूल

आयपीएल २०२३ चा कालचा सिझन हा समाप्त झाला आहे. कालच्या या रणसंग्राममध्ये चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली आहे. काल धोनी फॅन्स खूप भावुक झाले होते.

आयपीएल २०२३ चा कालचा सिझन हा समाप्त झाला आहे. कालच्या या रणसंग्राममध्ये चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली आहे. काल धोनी फॅन्स खूप भावुक झाले होते. आयपीएल २०२३ च्या सुरुवातीपासूनच असे सांगण्यात येत होते की या वर्षी महेंद्र सिंह धोनी इंडियन प्रीमियर लीगमधून देखील निवृत्ती घेणार. या सीझनमध्ये धोनीच्या चाहत्यांनी त्याला भरपूर प्रेम दिले आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील केला. फक्त चेन्नईच्याच नाही तर संपूर्ण देशामध्ये या वर्षी चेन्नई सुपर किंग्स आणि धोनीचे चाहते दिसून आले.

भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल म्हणून ओळख असलेला महेंद्र सिंग धोनीने या आधी जेव्हा त्याने टेस्ट क्रिकेट आणि वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा त्याने त्याच्या चाहत्यांना न सांगता निवृत्ती घेतली होती. त्यामुळे त्याचे चाहते त्याला सोशल मीडियाच्या मार्फत नेहमीच सांगत होते की तू जेव्हा निवृत्ती घेशील तेव्हा तू आम्हाला एक कळवं. कालचा सामना संपल्यानंतर त्याने धोनीने स्पष्ट केले की, “मला या वर्षी चाहत्यांनी भरपूर प्रेम दिले आहे त्यामुळे आणखी एक सिझन खेळणार आहे असे धोनी म्हणाले”

सामना सुरु झाल्यावर धोनीचे चाहते आणि चेन्नई सुपर किंग्सचे चाहते हे धोनीला मैदानामध्ये पाहण्यासाठी आतुर झालेले असतात. स्टेडियममध्ये फक्त एकाच नाव गाजत असते ते म्हणजेच ‘THALA’. धोनीला त्याच्या चाहत्यांनी अनेक नावे दिली आहेत. त्यामध्ये कॅप्टन कूल, थाला अजून बरेच काही. महेंद्र सिंह धोनी पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळणार त्यामुळे चाहते आणि क्रिकेट प्रेक्षक पुढचा सिझन पाहण्यासाठी उत्सुक आहेत आणि पुढेच वर्ष हे धोनीचे शेवटचे वर्ष असणार आहे त्यामुळे त्याचे चाहते काय धोनीसाठी स्पेशल करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

“आदिपुरुष” चित्रपटातील गाणे झाले रिलीज, प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss