Wednesday, November 29, 2023

Latest Posts

फायनलचा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार नरेंद्र मोदी, त्याचसोबत ऑस्ट्रेलियाचे डेप्युटी पीएम रिचर्ड, अंबानी, अदानी…

भारतीय क्रिकेट संघाने या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला होता

भारतीय क्रिकेट संघाने या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला होता, ज्यामध्ये भारताने बाजी मारली होती आणि आता शेवटचा सामनाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला जाईल, जो या विश्वचषकाचा अंतिम सामना असेल. विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या संपूर्ण विश्वचषकात भारताने चमकदार कामगिरी केली आहे आणि १० पैकी १० सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना पाहण्यासाठी जाणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींसोबत ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्सही उपस्थित राहणार आहेत . पंतप्रधान कार्यालयाने (PMO) पंतप्रधान मोदींचे सामना पाहण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींशिवाय उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानीही उपस्थित राहणार आहेत . याशिवाय बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगण देखील अंतिम सामना पाहण्यासाठी येण्याची शक्यता आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. भारताने नाणेफेक जिंकून चार गड्यांच्या मोबदल्यात ३९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ४८.५ षटकांत ३२७ धावा करून बाद झाला. याआधी भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला पराभूत करून २०११ चा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारताने सलग सर्व सामने जिंकले आहेत . भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सने पराभव केला होता. दिल्लीत झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला. तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला.

तसेच चौथ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला. त्यानंतर धर्मशाला येथे भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. लखनौमध्ये झालेल्या सहाव्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. याशिवाय भारताने श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सचा पराभव केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल यापूर्वी २००३ मध्ये झाली होती, परंतु भारतीय संघ हा सामना हरला होता. अशा परिस्थितीत २० वर्षांनंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषक ट्रॉफीसाठी भिडणार आहेत.

हे ही वाचा : 

मालिकेत येणार मोठा ट्विस्ट;मधूभाऊंची  सुभेदारांच्या घरात होणार एन्ट्री!

Maharashtra: ते बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाले, संजय राऊतांची आक्रमक भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss