Thursday, April 25, 2024

Latest Posts

डायमंड लीग लीगमध्ये नीरजचा पहिलाच थ्रो ८८.६७ मीटर

नीरज चोप्राने (Neeraj Chopra) त्याच्या २०२३ सीझनमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे कारण त्याने सिझन- ओपनिंग २०२३ दोहा डायमंड लीग जिंकली.

नीरज चोप्राने (Neeraj Chopra) त्याच्या २०२३ सीझनमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे कारण त्याने सिझन- ओपनिंग २०२३ दोहा डायमंड लीग जिंकली. भारताचा गोल्डन बॉय (India’s Golden Boy) आणि भालाफेक स्टार खेळाडू ८८.६७ मीटर फेकसह नीरज चोप्रा जागतिक आघाडीवर आहे. डायमंड लीग मीटिंगमध्ये (doha diamond league) चोप्राचा हा दुसरा विजय होता. गेल्या वर्षी लुसाने येथे डायमंड लीग मीटिंग जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये जागतिक आघाडीवर आता भारताचा नीरज चोप्रा आहे. कारण त्याने या सीझनमध्ये पहिलाच थ्रो हा ८८.६७ मीटर फेकला.

टोकियो रौप्यपदक विजेता जेकब वडलेज आणि जगज्जेता अँडरसन पीटर्स आणखीं कोणताही खेळाडू हे अंतर पार करू शकला नाही. निरजाने गेल्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकून पुन्हा एक इतिहास रचला आहे. जागतिक स्पर्धेमध्ये पदक मिळवणारा तो दुसरा भारतीय आणि महिला पुरुष ट्रॅक आणि फील्ड ऍथलेटिक्स ठरला आहे. लांब उडीमध्ये अंजू बॉबी जॉर्ज अशी पहिली भारतीय ठरली आहे.

नीरज चोप्राकडे आधीच ऑलिम्पिक सुवर्णपदक आहे, जे त्याने २०२० च्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये जिंकले आहे हे खेळामधील ऍथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच पदक होते. २००८ मध्ये बीजिंग गेम्समध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीमध्ये पदक जिंकल्यानंतर ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक आहे. मागील वर्षी स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये ८९.९४ मीटर फेक करून पुरुषांच्या भालाफेकीत राष्ट्रीय विक्रम केला. नीरजने २०१८ मध्ये कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

हे ही वाचा : 

घरातील जुने, मळकटलेले सोफे स्वच्छ करायचेत? मग वापरा ‘या’ सोप्या टिप्स

अजित पवारांकडून निर्णयाचे स्वागत, तर पुढील ८ दिवस करणार राज्यभर दौरा

Raj Thackeray यांनी काढले अजित पवारांचे व्यंगचित्र, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss