spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

ऑस्ट्रेलियात शतक ठोकणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू “नितीश रेड्डी”

भारत ऑस्ट्रेलियामध्ये चौथी कसोटी सुरु आहे. या कसोटीत नितीश कुमार रेड्डीने शतक मारला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पकडीत असलेला सामना एक एक धाव करत नितीश रेड्डीने काढून घेतला.

भारत ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावाच हिरो ठरला तो नितीश कुमार रेड्डी.. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. 
नितीश रेड्डी आता ऑस्ट्रेलियात शतक ठोकणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. नितीशने वयाच्या 21 वर्षे 216 दिवसात ही कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये नितीश रेड्डीपेक्षा कमी वयात शतक झळकावणारे एकमेव भारतीय खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर आणि ऋषभ पंत आहे. आता यांच्या नंतर नितीश रेड्डी यांचे नाव या यादीत मोजले जाणार आहे.

 

नितीश कुमार रेड्डीने 172 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या कस्टोतीत त्याने 10 चौकार आणि एक षटकार लगावला.

 

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा हा कसोटी सामना पाहण्यासाठी नितीश रेड्डीचे कुटुंबीय देखील आले होते. यावेळी नितीश कुमारचे वडीलांना मुलाचं शतक बघून आनंदाने रडू कोसळले. 
नितीश रेड्डीने शतक झळकावल्यानंतर मैदानात उपस्थित असणाऱ्यांसोबतच सर्व भारतीय भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. 

Latest Posts

Don't Miss