spot_img
spot_img
Wednesday, September 20, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीला करोडो भारतीयांचं मिळतंय प्रेम, बुमराहला दिलं स्पेशल गिफ्ट…

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोलंबोत (Colombo) महामुकाबला सुरु आहे. रविवारी पावसामुळे सामना थांबवावा लागला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोलंबोत (Colombo) महामुकाबला सुरु आहे. रविवारी पावसामुळे सामना थांबवावा लागला. राखीव दिवशी म्हणजेच आज उर्वरित खेळ (IND vs PAK) होणार आहे. शुभमन गिल (Shubman Gill) याने शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याची चांगलीच धुलाई केली होती. पण सोशल मीडियावर शाहीन आफ्रिदी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत होता. शाहीन आफ्रिदीने ज्युनिअर बुमराहसाठी (Bumrah) खास गिफ्ट आणले होते. सामना पावसामुळे थांबवला, त्यावेळी शाहीन आफ्रिदीने याने जसप्रीत बुमराह याला गिफ्ट दिले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. शाहीन आफ्रिदीच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. भारतीय चाहत्यांनीही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

रविवारी पावसामुळे सामना थांबवण्यात आला, त्यावेळी शाहीन आफ्रिदी याने हातात भेटवस्तू घेत टीम इंडियाची ड्रेसिंग रुम गाठली. शाहीन आफ्रिदी याने बुमराहची (Jasprit Bumrah) भेट घेतली अन् त्याला बाप झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच ज्युनिअर बुमराहसाठी गिफ्टही दिलेय. या प्रसंगाचा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतोय. ‘बुमराह भाई आणि भाभी तुमचं खूप खूप अभिनंदन! देव तुमच्या मुलाला नेहमी आनंदी ठेवो’, असं शाहीन आफ्रिदी बुमराहला म्हणाल्याचे व्हिडीओतून दिसतेय. जसप्रीत बुमराह यानेही शाहीन आफ्रिदीचं गिफ्ट स्विकारलं अन् त्याचे मनापासून आभार व्यक्त केले. दोघांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसत होते.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सप्टेंबर रोजी साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यानंतर जसप्रीत बुमराह मायदेशात परतला होता. नेपाळविरोधातील सामन्यासाठी बुमराह उपल्बध नव्हता. संजनाने हिने गोंडस बाळाला जन्म दिला. जसप्रीत बुमराहने स्वत: ट्वीट करून बाळासंदर्भात माहिती दिली होती. बाळाचा आणि पत्नीचा हात हातात घेऊन बुमराहने फोटो पोस्ट केला आहे. “आयुष्यातील या नव्या जबाबदारीबद्दल खूष आहे”, असं त्याने पोस्टमध्ये लिहीलं होते. संजना गणेशन हिने 4 सप्टेंबर रोजी मुलाला जन्म दिला. बुमराह आणि संजना यांनी आपल्या बाळाचे नाव अंगद ठेवलेय. जसप्रीत बुमराह बाप झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानात परतलाय. पाकिस्तानविरोधातील सामन्यात त्याने कमबॅक केले. आज राखीव दिवशी सामना होणार आहे.

हे ही वाचा: 

राष्ट्रगीताला चुकीच्या पद्धतीने उभी राहिल्याने बॉलिवूडच्या बेबोला केले ट्रोल…

नाशिकमधील शेतकऱ्याचे आरक्षणासाठी सरणावर आमरण उपोषण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss