Friday, December 1, 2023

Latest Posts

राहुल द्रविडचा मुलगा समितने वडिलांचा पावलांवर ठेवले पाऊल, अंडर-19 संघात मिळाले स्थान

भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी यष्टीरक्षक फलंदाज राहुल द्रविडचा मुलगा समितही आपल्या वडिलांच्या मार्गावर निघाला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी यष्टीरक्षक फलंदाज राहुल द्रविडचा मुलगा समितही आपल्या वडिलांच्या मार्गावर निघाला आहे. समितला विनू मांकड ट्रॉफी २०२३ साठी कर्नाटकच्या १५ सदस्यीय अंडर-१९ संघाचा भाग बनवण्यात आले. ही एकदिवसीय स्पर्धा आहे, ज्यामध्ये समित मैदानात उतरून खळबळ माजवेल. ही स्पर्धा १२ ते २० ऑक्टोबर दरम्यान हैदराबाद येथे खेळवली जाणार आहे.

समित यापूर्वी १४ वर्षांखालील स्पर्धेत कर्नाटककडून खेळला आहे. पण समित प्रथमच अंडर-१९ साठी मैदानात उतरणार आहे. यावेळी त्याला वरिष्ठ क्रिकेटचा काहीसा अनुभव मिळणार आहे. राहुल द्रविड त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अंडर-१५, अंडर-१७ आणि अंडर-१९ मध्ये राज्य स्तरावर खेळला आहे. मोठा मुलगा समित व्यतिरिक्त द्रविडचा धाकटा मुलगा अन्वय देखील क्रिकेट खेळतो. अन्वयला यंदाच्या झोनल टूर्नामेंटसाठी कर्नाटक अंडर-१४ संघाचा कर्णधार बनवण्यात आले. दोन्ही मुले वडिलांच्या मार्गावर चालताना दिसतात.

एकदिवसीय विश्वचषक २०२३ हा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावणारा राहुल द्रविड वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासोबत व्यस्त असणार आहे. तर विनू मांकड ट्रॉफी ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अशा स्थितीत वर्ल्ड कपमुळे तो मुलगा समित याला अंडर-१९ स्पर्धेत खेळताना बघता येणार नाही. राहुल द्रविड हा भारताच्या महान फलंदाजांपैकी एक होता. त्याने १९९६ ते २०१२ पर्यंत भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. या काळात द्रविडने १६४ कसोटी आणि ३४४ एकदिवसीय सामने खेळले. २८६ कसोटी डावांमध्ये त्याने ५२.३१ च्या सरासरीने १३२८८ धावा केल्या ज्यात ३६ शतके आणि ६३ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, एकदिवसीय सामन्यांच्या ३१८ डावांमध्ये त्याने ३९.१६ च्या सरासरीने १०८८९ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने १२ शतके आणि ८३ अर्धशतके केली.

हे ही वाचा: 

अयोध्येतील राममंदिर ला बॉम्बने उडवण्याची धमकी

केंद्र सरकारचे शेतकऱ्यांसाठी नवीन चार उपक्रम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss