क्रिकेट विश्वातील अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रवींद्र जडेजा २०२४ मह्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.सध्या तो आपल्याला कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसतो. अलिकडेच, जडेजा ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला. पाच सामन्यांच्या मालिकेत, तीन सामन्यांमध्ये जडेजाला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले. मात्र, आता त्याने केलेल्या एका इंस्टाग्राम पोस्टमुळे पुढील कसोटी मालिकेपूर्वी जडेजा या फॉरमॅटला पूर्णविराम देणार का ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सिडनीमध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची शेवटची कसोटी खेळली गेली, ज्यामध्ये भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघ पिंक जर्सीमध्ये खेळू शकतो. जडेजाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये त्याच सिडनी टेस्ट जर्सीचा एक फोटो शेअर केला आहे. जर्सीवर जडेजाचे नाव आणि त्याचा ८ क्रमांक दिसत आहे. जड्डूच्या या स्टोरीवर सोशल मीडियावरील चाहत्यांनी असा अंदाज बांधण्यास सुरुवात केली की, भारतीय अष्टपैलू खेळाडू Ravindra Jadeja आता टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर कसोटी क्रिकेटला निरोप देण्याचा विचार करत आहे.
रवींद्र जडेजाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ८० कसोटी आणि १९७ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. शिवाय त्याने ७४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटी सामन्यांमध्ये जडेजाने ३३७० धावा केल्या आहेत आणि ३२३ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, जडेजाने एकदिवसीय सामन्यांमध्ये २७५६ धावा आणि २२० विकेट्स घेतल्या आहेत. उर्वरित टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ५१५ धावा केल्या आणि ५४ विकेट्स घेतल्या.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये जडेजाने फलंदाजी करताना २७ च्या सरासरीने १३५ धावा केल्या होत्या, गोलंदाजी करताना ४ विकेट घेतल्या होत्या. गाबा येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर जड्डूचा साथीदार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण, जडेजाने फक्त जर्सीचा फोटो शेअर केला आहे, त्याने निवृत्तीबद्दल काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे जडेजाच्या या पोस्टवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्तिथ केले जात आहेत.
हे ही वाचा:
MNS बद्दल विचारताच आदित्य ठाकरेंनी साधला राज ठाकरेंवर निशाणा !, म्हणाले,…
मालाडमध्ये चोराचा अनोखा कारनामा!, मौल्यवान वस्तू मिळाल्या नाही म्हणून घेतला महिलेचा…