Saturday, April 20, 2024

Latest Posts

RCB vs GT, आरसीबी प्लेऑफचे स्वप्न होणार का साकार?

आज आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स (Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans) या दोन संघांमध्ये रंगणार आहे.

आज आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स (Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. गुजरात टायटन्सचा संघ हा सर्वात आधी आयपीएल २०२३ मध्ये प्लेऑफमध्ये जाणारा पहिला संघ आहे. आजचा हा सामना बंगलोर मध्ये एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium) होणार आहे. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी आजचा सामना महत्वाचा आहे. बंगलोरचा संघ आजच्या सामन्यात पराभव झाल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ प्लेऑफमधून बाहेर होईल. मागिल सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून एकतर्फी पराभव केला होता.

आजचा आयपीएलचा दुसरा सामना संध्या ७.३० वाजता एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. या मैदानावर लक्षच पाठलाग करणाऱ्या संघाला फायदा होता. त्याचबरोबर या मैदानावर खेळपट्टीवर वेगाने धावा होत आहेत. या परिस्थितीमध्ये गोलंदाजांना धावा रोखणे फार कठीण आहे. या खेळपट्टीवर झालेल्या ८७ सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी संघाला ३७ वेळा विजय मिळवला आहे. तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने ४६ वेळा विजय मिळवता आला आहे. हे दोन्ही संघ आमनेसामने २ वेळा आले आहेत. यापैकी गुजरात टायटन्सने १ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १ सामना जिंकला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संभाव्य प्लेइंग ११
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड

गुजरात टायटन्स संभाव्य प्लेइंग ११
शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (क), डेव्हिड मिलर, दासून शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद

हे ही वाचा:

IPL2023, कोणता संघ प्लेऑफचे चौथे स्थान मिळणार?

Aluminium Foil Paper वापरणे टाळा, उद्भवू शकतो आरोग्यावर मोठा परिणाम!

वर्षा निवासस्थानी जाऊन भगतसिंह कोश्यारींनी घेतली एकनाथ शिंदेची भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss