spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

रोहित शर्माला वनडे संघातूनही काढले जाणार! बीसीसीआयने बदली निवडली?

टी-20 विश्वचषक जिंकणे ही रोहित शर्मासाठी २०२४ सालातील एकमेव मोठी उपलब्धी म्हणता येईल. या व्यतिरिक्त टीम इंडियाने त्याच्या नेतृत्वाखाली संघर्ष केला आहे

टी-20 विश्वचषक जिंकणे ही रोहित शर्मासाठी २०२४ सालातील एकमेव मोठी उपलब्धी म्हणता येईल. या व्यतिरिक्त टीम इंडियाने त्याच्या नेतृत्वाखाली संघर्ष केला आहे आणि विशेषत: गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर, रोहितच्या नेतृत्वाखाली आकडेवारी खराब होत गेली आहे. २०२४ मध्ये त्याची वैयक्तिक कामगिरीही फारशी चांगली नव्हती, परिणामी तो सिडनी कसोटीतून बाहेर पडला. आता एका मीडिया रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की, बीसीसीआयने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार रोहित शर्माच्या बदलीचा शोध सुरू केला आहे.

T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता कसोटीतून निवृत्तीच्या अटकळींदरम्यान, एका नवीन अहवालात असे दिसून आले आहे की रोहित शर्माच्या वनडे संघाच्या कर्णधारपदाला धोका असल्यास किंवा बीसीसीआयला त्याच्यावर दबाव आणायचा असेल तर हार्दिक पांड्याकडे वनडे संघाची कमान सोपवली जाऊ शकते. आहे. हार्दिक पांड्याने गेल्या 2 वर्षात पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा भरपूर अनुभव मिळवला आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला दीड महिना बाकी असताना हा अहवाल आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ आधीच जाहीर झाला आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहित शर्मा जेव्हा T20 मधून निवृत्त झाला तेव्हा हार्दिक पांड्या त्याचा उत्तराधिकारी होईल अशी अटकळ बांधली जात होती, पण नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघ व्यवस्थापनासह T20 संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवले.

हे ही वाचा:

CM Devendra Fadnavis बंदुकीचे राज्य मोडून काढतील असा संजय राऊतांचा विश्वास

सगळे दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाही तो पर्यंत सगळी कारवाई पोलीस करतील- Devendra Fadanvis.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss