Wednesday, June 7, 2023

Latest Posts

RRvsSRH, कोण मारणार बाजी, राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

आयपीएल २०२३ च्या आजच्या रविवारच्या डबल डेकन सामन्यामध्ये दुसरा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हे दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.

आयपीएल २०२३ च्या आजच्या रविवारच्या डबल डेकन सामन्यामध्ये दुसरा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हे दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. सध्या आयपीएलच्या गुणतालिकेमध्ये राजस्थान रॉयल्स संघ चौथ्या स्थानावर आहेत. आजचा हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडणार आहे. राजस्थानच्या संघाने आतापर्यत दहा सामने खेळले आहेत त्यापैकी पाच सामने जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्स मागील दोन सामन्यांमध्ये पराभवानंतर आज विजयासाठी मैदानामध्ये उतरणार आहे.

आयपीएल गुणतालिकेमध्ये सनरायझर्स हैदराबाद शेवटच्या दहाव्या स्थानावर आहे. हैदराबाद संघानेया वर्षीच्या सीझनमधील नऊ पैकी तीन सामने जिंकले आहेत. हैदराबाद संघाला मागील पाच सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकता आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मागील सामन्यात हैदराबादला पाच धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये एकूण १७ सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. त्यापैकी सनरायझर्स हैदराबाद संघाने आठ सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्स संघाने नऊ सामने जिंकले आहेत.

सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेईंग ११
अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हॅरी ब्रूक, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, अकेल होसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक

राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेईंग ११
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, ऍडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss