Friday, April 26, 2024

Latest Posts

Gujrat Titans ला मिळवून दिले शुभमन गिल आणि मोहित शर्माने अंतिम फेरीचे तिकीट

आज पार पडलेला क्वालिफायर २ चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करून मुंबई इंडियन्स समोर २ गडी बाद करून २३३ धावांचे लक्ष उभे केले. गुजरात टायटन्सचा सलामी फलंदाज शुभमन गिल आयपीएल २०२३ मध्ये ३ शतक ठोकून त्याने आता ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. शुभमन गिलला धावा करण्यात साथ गुजरातचा फलंदाज साई सुदर्शन याने दिली. शुभमन गिलने ६० चेंडूंमध्ये १० षटकार आणि ७ चौकार मारून १२९ धावा केल्या. त्याचबरोबर साई सुदर्शनने ३१ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकांमध्ये येऊन १३ चेंडूंमध्ये २८ धावा ठोकल्या. गुजरातचा सलामी फलंदाज रिद्धिमान साहाने १६ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या.

मुंबई इंडियन्सचे गोलंदाज गुजरात टायटन्सच्या फलंदाजांसमोर फेल झाले. मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज पियुष चावला आणि आकाश माधवाल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतला. सामन्याच्या दरम्यान मुंबईचा विकेटकीपर ईशान किशन याला दुखापत झाल्यामुळे तो सामान्यामधून बाहेर गेला. त्यांनतर मुंबईच्या गोलंदाजांनी देखील त्यांच्या चाहत्यांना निराश केले. ईशान किशनला दुखापत झाल्यामुळे तो फलंदाजी करण्यासाठी येऊ शकला नाही. त्यामुळे ईशान किशनच्या जागेवर निहाल वढेरा याला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. परंतु त्याची बॅट सुद्धा काही चालली नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा त्याच्या फलंदाजीमुळे निराश केले आहे. कॅमेरून ग्रीनला सामन्याच्या दरम्यान दुखापत झाली होती.

दुखापत असूनही संघाला गरज असल्यामुळे कॅमेरून ग्रीन पुन्हा फलंदाजी साठी आला होता आणि त्याने २० चेंडूंमध्ये ३० धावा केल्या. मुंबई इंडियन्सचा धुव्वादार फलंदाजी करणारा सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक ३८ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. त्यामध्ये त्याने २ षटकार आणि ७ चौकार ठोकले. त्यांनतर टिळक वर्माने १४ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजासमोर मुंबई इंडिअन्सचे फलंदाज फेल झाले. मोहित शर्माने अप्रतिम कामगिरी करून ५ गडी बाद केले. तर राशिद खानने आणि मोहमद शमीने प्रत्येकी २ विकेट्स घेतले. लिटिल ने १ विकेट घेतली. आयपीएल २०२३ चा फायनलच्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स समोर पुन्हा एकदा गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss