spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघात मोठी उलथापालथ; स्टार खेळाडूने अखेर उचलले मोठे पाऊल

Shubman Gill To Play Ranji Trophy : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघात मोठ्या घटना घडताना दिसत आहेत. भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघही जाहीर केला नसून ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर भारतीय संघावर प्रचंड टीका होत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह इतर खेळाडूंनाही संपूर्ण जगभरात न खेळल्याबद्दल टार्गेट करण्यात येत आहे. या खेळा दरम्यान भारताकडून फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा खेळाडू शुभमन गिलवरही ऑस्ट्रेलियातुन टीका करण्यात येत आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाच्या टी-20 संघातून पण त्याला वगळण्यात आले आहे. त्यामुळे शुभमन गिलने मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर, त्याने रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर येत आहे.

भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल संघाच्या आगामी रणजी ट्रॉफी सामन्यात पंजाबकडून कर्नाटकविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. 23 ते 26 जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या 2024-25 हंगामातील सहाव्या एलिट ग्रुप सी सामन्यात पंजाबचा सामना कर्नाटकशी होणार आहे. जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध यशस्वी जयस्वालच्या कसोटी पदार्पणानंतर गिलला 3 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरवण्यात आले. गिलला त्याच्या नवीन फलंदाजीच्या स्थितीत फारसे यश मिळाले नाही आणि 50 धावांचा टप्पा गाठण्यात तो अपयशी ठरला. 2024 मध्ये त्याचा संघर्ष सुरूच राहिला आणि गिलने पुढील पाच डावांमध्ये 36, 10, 23, 0 आणि 24 धावा केल्या. भारतात चमकदार कामगिरी केली. त्याने 12 सामन्यांच्या 22 डावात 3 शतके आणि 3 अर्धशतकांसह 866 धावा केल्या. पण आशियाबाहेर गिलची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पाचही शतके आशियामध्ये झळकावली आहेत. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये फक्त 2 अर्धशतके केली आहेत.

भारताच्या टी-20 संघातून डच्चू
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आगे. याशिवाय, यशस्वी जैस्वाल हा देखील एक सलामीचा पर्याय आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर गिलला कर्णधार बनवण्यात आले होते तर श्रीलंका दौऱ्यावर तो उपकर्णधार होता.

Latest Posts

Don't Miss