Sunday, November 19, 2023

Latest Posts

Ind vs Aus Live Score Fin – टीम इंडियाला धक्क्यावर धक्के, रोहितपाठोपाठ श्रेयसही आऊट

भारताला पहिला धक्का बसलाय. शुभमन गिल फक्त चार धावा काढून बाद झाला. भारतीय संघ एक बाद 30 धावा

टीम इंडियाला मोठा झटका, रोहित शर्मा आऊट

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २० वर्षांनी आमनेसामने आले आहेत. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया २००३ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचले दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २० वर्षांनी आमनेसामने आले आहेत. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया २००३ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचले होते, त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली होती. आता भारतीय सघाकडे या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे.

 

टीम इंडियाला ७६ च्या स्कोअरवर दुसरा धक्का बसला आहे. रोहित शर्मा ४७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहितने आपली विकेट गमावली. ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर पाठीमागे धावताना ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेतला. रोहितने बाद होण्यापूर्वी ३१ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले.

भारताची धावसंख्या ७ षटकांनंतर एक विकेट गमावून ५४ धावा आहे. रोहित शर्मा २२ चेंडूत ३३ धावा करून खेळत आहे. त्याचवेळी नवीन फलंदाज विराट कोहलीने १३ चेंडूंचा सामना केल्यानंतर १६ धावा केल्या आहेत. स्टार्कच्या षटकात किंग कोहलीने पाठीमागे तीन चौकार मारले.

 

 

विराट कोहलीने मिचेल स्टार्कला लागोपाठ तीन चौकार लगावले. भारताचे अर्धशतक फलकावर…. रोहित शर्मा 32 तर कोहली 15 धावांवर भारताला पहिला धक्का बसलाय. शुभमन गिल फक्त चार धावा काढून बाद झाला. भारतीय संघ एक बाद 30 धावा रोहित शर्माने हेजलवूडला लगावला षटकार…. रोहित-गिलची शानदार सुरुवात विराट कोहलीने मिचेल स्टार्क याला सातव्या ओव्हरमध्ये सलग तीन चौकार मारत आपल्या इनिंगची झकास सुरूवात केलीये. त्यासोबतच विराटन वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगला मागे टाकलं. विराटने वर्ल्डकपमध्ये 1755 धावा केल्या असून तो आता मैदानात नाबाद आहे. पॉन्टिंगच्या वर्ल्ड कपमध्ये 1743 धावा केल्या आहेत. या यादीत टॉपला सचिन तेंडुलकर असून त्याने 2278 धावा केल्या आहेत.

 

हे ही वाचा : 

 वर्ल्डकपच्या सामन्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला उस्तुक, “भारतच ट्रॉफी जिंकेल”

WORLDCUP 2023: कोण जिंकणार WORLDCUP चा सामना?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss