Friday, April 26, 2024

Latest Posts

Shubman Gill ने झळकावली एकाच सीझनमध्ये तीन शतके, अंतिम सामन्यात चौथे शतक?

आयपीएल २०२३ (IPL 2023) च्या सीझनमध्ये खेळाडूंनी बॅट चालवून धावांचा पाऊस पडला. काल पार पडलेला क्वालिफायर २ (Qualifier 2) चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्सच्या (Mumbai Indians vs Gujarat Titans) सामन्यामध्ये मुंबईचा गुजरातने दारुण पराभव केला.

आयपीएल २०२३ (IPL 2023) च्या सीझनमध्ये खेळाडूंनी बॅट चालवून धावांचा पाऊस पडला. काल पार पडलेला क्वालिफायर २ (Qualifier 2) चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्सच्या (Mumbai Indians vs Gujarat Titans) सामन्यामध्ये मुंबईचा गुजरातने दारुण पराभव केला. गुजरात टायटन्सला अंतिम फेरीपर्यत पोहोचवण्यात सलामी गुजरातचा सलामी फलंदाज शुभमन गिलचा मोठा वाटा आहे. शुभमन गिलने (Shubman Gill) इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये ३ शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर त्याने ८०० धावांचा टप्पा पार करून आयपीएल इतिहासातील चौथा फलंदाज ठरला आहे. शुभमनने आयपीएलमधील ऑरेंज कॅपवर देखील कब्जा केला आहे.

एकाच सीझनमध्ये तिसरे शतक झळकावणारा शुभमन हा तिसरा खेळाडूं बनला आहे. या आधी विराट कोहली (Virat Kohli) आणि जोस बटलर (Jos Butler) यांनी हा विक्रम केला आहे. विराट कोहलीने २०१६ मध्ये ९७३ धावा करून सीझनमध्ये ४ शतके ठोकली आहेत. त्याचबरोबर २०२२ मध्ये जोस बटलरने राजस्थान रॉयल्ससाठी ८६३ धावा करताना ४ शतके ठोकली होती.

शुभमन गिलने फक्त आयपीएलमध्येच नाही तर बांगलादेश विरुद्ध देखील त्याने शतक झळकावले आहे. त्यानंतर त्याने न्यूझीलंड विरुद्ध विक्रमी द्विशतकांसह मायदेशात तीन एकदिवसीय शतके झळकावली आहेत. या आधी आयपीएलमध्ये मुरली विजय, वीरेंद्र सेहवाग, वृद्धिमान साहा, शेन वॉटसन, जोस बटलर आणि रजत पाटीदार यांच्यानंतर इंडियन प्रेमियर लीगमध्ये प्लेऑफ मध्ये शतक झळकावणारा शुभमन गिल हा सातवा फलंदाज आहे. २३ व्या वर्षात अशी कामगिरी करणारा शुभमन हा पहिलाच फलंदाज आहे.

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

Gujrat Titans ला मिळवून दिले शुभमन गिल आणि मोहित शर्माने अंतिम फेरीचे तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss