Saturday, June 3, 2023

Latest Posts

काल आयपीएलच्या मैदानात सूर्याचे वादळ, मुंबई गुणतालिकेत तिसऱ्या थेट क्रमांकावर

काल पार पडलेला मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगरुळुच्या (Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore) सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने बाजी मारली आहे.

काल पार पडलेला मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगरुळुच्या (Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore) सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने बाजी मारली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसी (Faf Duplessis) आणि मॅक्सवेलने (Maxwell) संघासाठी अप्रतिम फलंदाजी करूनही रॉयल चॅलेंजर्स बंगरुळूरच्या संघाला पराभव पत्करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगरुळुने पहिली फलंदाजी करत २०० धावांचे लक्ष उभे केले होते परंतु मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी ते सहजपणे पार केले. मुंबई इंडियन्सने पहिल्या षटकापासूनच आपली धावांची सरासरी १० धावा प्रति षटकाच्या आसपास ठेवली होती. मुंबई इंडियन्सच्या संघाने आरसीबीचे २०० संख्यांचे आव्हान १७ षटकामध्येच पार केले.

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सर्वाधिक ८३ धावा फक्त ३५ चेंडूमध्ये केल्या. आरसीबीच्या गोलंदाजांना सूर्यकुमारने चांगलेच धुतले. त्याने २३७.१४ च्या स्ट्राईक रेटने धावा करत मुंबईला महत्वाच्या सामन्यात विजय मिळवून दिला. त्याला नेहल वधेराने (Nehal Vadhera) ५२ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. मुंबईकडून जेसन बेहरनडॉर्फने चांगला मारा करत ३६ धावा देत ३ विकेट्स घेतले. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फने (Jason Behrendorf) पहिल्याच षटकामध्ये विराट कोहलीला (Virat Kohli) १ धावेवर बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकात त्याने अर्जुन रावतला (Arjun Rawat) ६ धावांवर बाद करत आरसीबीला दुसरा धक्का दिला.

कालचा सामना जिंकून मुंबई इंडियन्स संघाने गुणतालिकेमध्ये डायरेक्ट तिसऱ्या स्थानावर उडी मारली आहे तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ खाली घसरला आहे. मुंबईचे संघाने ११ सामने खेळून सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर आरसीबी संघाने ११ सामने खेळून सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. गुणतालिकेमध्ये प्लेऑफ मध्ये जाण्याची लढत ही अत्यंत रंगत होत चालली आहे. चार संघांचे गुण हे १० आहेत परंतु त्यांच्या रन रेटमध्ये फरक असल्यामुळे त्यांची जागा ठरवली जात आहे. या आयपीएलच्या सीझनमध्ये कोण प्लेऑफ मध्ये जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

The kerala story चित्रपटांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, सडलेल्या मनाच्या विचारांना….

Karnataka विधानसभा निवडणुकीसाठी आज होणार मतदान, कुणाची सत्ता येणार?

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा, घरगुती मसाला ताक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss