spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

Suryakumar Yadav Ranji Trophy : रोहितनंतर सूर्यकुमारच्या बॅटला लागलं ग्रहण; मुंबईची बिकट अवस्था

Suryakumar Yadav Ranji Trophy : रणजी ट्रॉफी सध्या भारतात खेळली जात असून उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू झाले आहेत. क्वार्टर फायनलचा सामना मुंबई आणि हरियाणामध्ये पार पडत आहे. संघामधील हा सामना कोलकात्तामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सुरुवात मात्र खूपच खराब झाल्याने रणजीत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. सर्वाधिक ४२ वेळा विजेता ठरलेल्या अन गट विजेते असलेल्या मुंबई संघासमोर हरियाणा संघाचे आव्हान आहे. कोलकात्तामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर हरियाणाने बाजी मारलेली दिसतेय.

Mumbai vs Haryana Ranji Trophy Final : हरियाणाच्या २९ धावांवर मुंबई संघाचे ४ फलंदाज आउट झाले आहेत तर यात सूर्यकुमार यादवचाही समावेश आहे. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांनाही मुंबई संघात स्थान मिळाले असले तरीही सूर्य ५ चेंडूत ९ धावा करून त्रिफळाजीत झाला, तर शिवम दुबेला मैदानावरील अम्पायरने LBW दिले होते, परंतु त्याने DRS घेतला अन हा निर्णय बदलला गेला, त्यामुळे मुंबईला पाचवा धक्का बसता बसता राहिला.

सूर्यकुमार ठरतोय अपयशी
सूर्यकुमारने गेल्या पाच सामन्यांमध्ये मुंबईसाठी काही खास कामगिरी केलेली नाही. गेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी कर्नाटकविरुद्ध 20 धावा केल्यानंतर तो बाद झाला होता. यानंतर, 23 डिसेंबर रोजी, हैदराबादविरुद्ध 18 धावा करून तो बाद झाला. पंजाब आणि पुद्दुचेरीविरुद्ध खातेही उघडू शकले नाही.
मुंबई-हरियाणा दरम्यात सूर्याने फक्त 9 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यादरम्यान त्याने 2 चौकार मारले. मुंबई संघाने मोठ्या सामन्यात आपले पहिले 4 विकेट फक्त 25 धावांत गमावले.

हे ही वाचा :

संरक्षण उत्पादन क्षेत्रात पॉलिसी तयार करणारे ‘महाराष्ट्र’ पहिले राज्य!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा 

Latest Posts

Don't Miss