spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

टीम इंडिया सज्ज! 1 मालिका आणि 3 सामने, 10 जानेवारीपासून वनडे सीरिज, टीम इंडिया सज्ज, पहिला सामना कुठे?

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला सिडनीत झालेल्या पाचव्या पाचव्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी ६ विकेट्सने पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने यासह तब्बल १० वर्षांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी उंचावली. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-१ अशा फरकाने जिकंली. त्यानंतर आता मेन्स टीम इंडिया मायदेशात इंग्लंड विरुद्ध टी 20i आणि वनडे सिरीज खेळणार आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात हि २२ जानेवारीपासून ती 20i मालिकेने होणार आहे. या मालिकेत जवळपास ३ आठवड्यात अवधी बाकी आहे. क्रिकेट चाहत्यांना या दरम्यान वूमन्स इंडिया क्रिकेट टीमचे सामने पाहायला मिळणार आहेत.

वूमन टीम इंडिया नववर्षात मायदेशात पहिलीच आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध भिडणार आहे. आयर्लंड या दौऱ्यात फक्त एकदिवशीय एकदिवसीय मालिकाच खेळणार आहे. एकूण ३ सामन्यांची ही मालिका असणार आहे. मालिकेचं आयोजन हे १० ते १५ जानेवारीदरम्यान करण्यात आलं आहे. हे सामने आयसीसी चॅम्पियन्शीप अंतर्गंत खेळवण्यात येणार आहेत. तसेच तिन्ही सामने हे एकाच मैदानात खेळण्यात येणार आहे. तिन्ही सामने हे सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम, राजकोट येथे होणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना सरावासाठी अधिक वेळ मिळणार, हे निश्चित आहे. या तिन्ही सामन्यांना सकाळी ११ वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी ११ वाजून ३० मिनिटांनी टॉस होईल.

दरम्यान या मालिकेला आता अवघे काही तास बाकी आहेत. मात्र अजूनही भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये संघ जाहीर होईल. यात कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डच्चू? याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, पहिला सामना, शुक्रवार १० जानेवारी, टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, दुसरा सामना, रविवार १२ जानेवारी, टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, तिसरा सामना, बुधवार १५ जानेवारी दरम्यान आयर्लंड वूमन्स टीम भारत दौऱ्यावर येणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला आयर्लंड मेन्स टीम झिंबाब्वे दौरा करणार आहेत. आयर्लंड मेन्स टीम झिंबाब्वे दौऱ्यात एकमेव कसोटी, वनडे आणि टी 20i मालिका खेळणार आहे. आयर्लंडच्या झिंबाब्वे दौऱ्याचं आयोजन हे ६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…

Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss