टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात २२ नोंव्हेबरपासून होणार आहे. त्या दोन्ही टीममध्ये पाच टेस्ट मॅच ची सीरीज खेळवली जाणार आहे . या मालिकेला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असेही नाव देण्यात आले आहे. सिरींजमधला पहिला सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. एका खेळाडू काही काळापासून दुखापतीचा सामना करत होता. दुखापतीमुळेच भारतीय सिलेक्टर्सनी त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीममध्ये निवड केली नाही. या खेळाडूवर परदेशात सर्जरी झाली आहे. लवकरच तो मैदानात परतणार आहे. टीम इंडियाचा स्टार स्पेनर बॉलर कुलदीप यादव बऱ्याच काळापासून ग्रोइन इंजरीमुळे त्याला त्रास होत आहे. याच्या दुखापतीमूळे न्यूझीलंड विरुद्धच्या संपूर्ण मालिकेला मुकला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीमची निवड करताना कुलदीप ग्रोइन इंजरीचा सामना करत असल्याच बीसीसीआयकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे त्याचा स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला नाही. कुलदीप यादवला सर्जरी करून घ्यावी लागेल अशी बातमी समोर आली होती. आता सर्जरी झाली असून माहिती त्याने दिली आहे.
कुलदीप यादवच्या ग्रोइन इंजरीवर जर्मनीमध्ये सर्जरी झाली आहे. यादवने आपलया सोशल मीडिया अकाऊंटवर जर्मनीचे काही फोटो शेअर केले आहे. त्यांनी नंतर एक फोटो सर्जरी नंतरचा आहे. या फोटो सोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलय ‘चांगल्या प्रकृतीसाठी मुंचनेमध्ये काही दिवस’. मुंचेन जर्मनीच एक शहर आहे. म्यूनिख या नावाचे ते ओखळलं जातं. म्यूनिखला जर्मनीमध्ये मुंचने म्हटलं जातं. कुलदीप यादववर २०२१ मध्ये सुद्धा एक सर्जरी झाली होती. त्यावेळी कुलदीप यादवच्या गुडघ्याच ऑपरेशन झालं होतं.
न्यूझीलंडच्या सीरीजनंतर बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये कुलदीप यादव गेला होता. कारण त्याला रिहॅबिलिटेशनचा सल्ला देण्यात आला होता. सर्जरीनंतरही त्याला रिहॅबिलिटेशन प्रोसेसमधून जावं लागेल. भारतात परतल्यानंतर तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये जाईल. कुलदीपला मैदानावर पुनरागमनासाठी काही काळ लागणार आहे. तो मैदानावर कधी परतणार? हे आत्ताच सांगता येणार नाही.
हे ही वाचा:
Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान