Friday, March 29, 2024

Latest Posts

निवृत्तीच्या दिवशी Ambati Rayudu च्या डोळ्यात अश्रू

काल आयपीएल २०२३ (IPL 2023) चा महासंग्राम पार पडला आणि चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) संघ पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) इतिहासात विजेतेपद जिंकणारा संघ ठरला आहे.

काल आयपीएल २०२३ (IPL 2023) चा महासंग्राम पार पडला आणि चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) संघ पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) इतिहासात विजेतेपद जिंकणारा संघ ठरला आहे. कालच्या चेन्नईच्या विजयानंतर अनेक खेळाडू भावुक झाले ते कॅमेरावर दिसून देखील आले. अनेकांनी वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या. कालचा सामना हा अत्यंत रोमांचक ठरला. शेवटच्या चेंडुपर्यत हा खेळ रंगला होता. याचदरम्यान अनुभवी खेळाडू अंबाती रायडू (Ambati Rayudu) याचा कालचा आयपीएल २०२३ चा फायनलचा सामना हा अंतिम सामना होता. कालचा शेवटचा सामना असल्यामुळे अंबाती रायडूच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले.

अंबाती रायडूने त्याच्या निवृत्तीची घोषणा आधीच केली होती की इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा सामना हा त्याचा अंतिम सामना असणार आहे. आयपीएल २०२३ चा हा सिझन अंबाती रायडूसाठी फार काही खास नव्हता परंतु त्याने कालच्या सामन्यामध्ये फलंदाजीसाठी मैदानात उतरताच धावांचा पाऊस पडला. त्यामध्ये त्याने ८ चेंडूंमध्ये २ षटकार आणि १ चौकार ठोकत सामना चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने केला.

कालच्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किग्सला २१४ धावांचे लक्ष दिले होते. परंतु पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना फक्त १५ ओव्हर्स चा खेळवण्यात आला आणि चेन्नईच्या संघाला १७१ धावांचे आव्हान देण्यात आले. चेन्नईची सलामी जोडी ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉनवे यांनी चेन्नईसाठी दमदार सुरुवात करून दिली. अजिंक्य रहाणेने देखील त्याची बॅट चालवली. त्याचबरोबर शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा हे दोघे शेवटच्या काही चेंडूंमध्ये होते आणि रवींद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंमध्ये एक षटकार आणि एक चौकार ठोकून चेन्नईला विजय मिळवून दिला.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

“आदिपुरुष” चित्रपटातील गाणे झाले रिलीज, प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss