spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

Thailand Open Badminton Tournament मध्ये किरण आणि लक्ष्यने मारली उपांत्य फेरीत उडी

सध्या सुरु असलेल्या थायलंड ओपन बॅटमिंटन स्पर्धेमध्ये भारताचे २ युवा खेळाडू किरण जॉर्ज आणि लक्ष्य सेन यांनी आपले विजयी लय कायम राखून थायलंड ओपन बॅटमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये उडी मारली आहे.

सध्या सुरु असलेल्या थायलंड ओपन बॅटमिंटन स्पर्धेमध्ये भारताचे २ युवा खेळाडू किरण जॉर्ज आणि लक्ष्य सेन यांनी आपले विजयी लय कायम राखून थायलंड ओपन बॅटमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये उडी मारली आहे. महिला एकेरी स्पर्धेमध्ये सायना नेहवाल, अश्मीता चलीहा यांना पराभवाचा सामना आहे. पुरुष दुहेरीमध्ये भारताची आघाडीची जोडी सात्विकसाईराज रँकींरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे आव्हान संपुष्टत आले आहे. लक्ष्यने चीनच्या लि शी फेंगला २१-१७, २१-१५ असे पराभूत केले. उपांत्यफेरीच्या आधी त्याच्यासमोर मलेशियाच्या लेऔन्ग जून हाओचे आव्हान असेल पुरुष एकेरीच्या अन्य लढतीत किरणने चीनच्या वेंग हाँग यांगला २१-११, २१-१९ असे सरळ गेममध्ये पराभूत केले.

महिला एकेरीमध्ये सायनाने चीनच्या हे बिंग जिआओकडून ११-२१, १४-२१ अशी हार पत्करावी लागली. अष्मिताला स्पेनच्या कॅरोलिना मरीनकडून १८-२१, १३-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या मोहम्मद शोशिबूल फिक्री व बोगस मौलाना जोडीने सात्विक व चिराग जोडीला २४-२६, २१-१९, २१-१७ असे पराभूत केले. त्यांनतर किरण जॉर्जने आपला चांगला फॉर्म कायम ठेवत मलेशिया ओपन बॅटमिंटन स्पर्धेमध्ये मलेशिया मास्टर्सचा उपविजेता हॉंग यांग वेंगचा १६, २१-११,२१-१९ असा पराभव केला.

लक्ष्य सेनने याआधी त्याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये उत्तम कामगिरी केली आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. मात्र किरण जार्जने पहिल्यांदाच जागतिक स्तरावर सहभाग घेऊन त्याची कामगिरी दाखवली आहे. लक्ष्य सेन आणि किरण जॉर्जने आता उपांत्य फेरी गाठली आहे पुढील लक्ष थायलंड ओपन बॅटमिंटन स्पर्धेत बाजी मारण्याचे असेल. सर्व बॅटमिंटन चाहत्यांचे लक्ष आता या दोघांकडे असणार आहे.

हे ही वाचा:

SSC 10th Result 2023, यंदा इयत्ता दहावीचा राज्याचा निकाल लागला 93.83 टक्के

Sharad Pawar – Eknath Shinde यांच्या भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

शिवराज्याभिषेक दिनानिम्मित Raj Thackeray यांनी केली पोस्ट शेअर, माझी एक तीव्र इच्छा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss