Monday, November 20, 2023

Latest Posts

भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या कर्णधार कमिन्सची संघर्षमय कहाणी

आयसीसी विश्वचषकाच्या (ICC ODI World Cup 2023) अंतिम सामन्यातऑस्ट्रेलियाने (Australia) भारताचा 6 गडी राखून पराभव करत सहावा एकदिवसीय विश्वचषक जिंकला.

आयसीसी विश्वचषकाच्या (ICC ODI World Cup 2023) अंतिम सामन्यातऑस्ट्रेलियाने (Australia) भारताचा 6 गडी राखून पराभव करत सहावा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद पटकावणारा कमिन्स ऑस्ट्रेलियाचा पाचवा कर्णधार ठरला आहे. या सामन्यात कमिन्सने कोहलीटी महत्त्वाची विकेट घेतली. 54 धावांवर खेळत असताना कमिन्सने विराटला अतिरिक्त बाऊन्स घेत चेंडूवर बाद केलं. स्टेडियममधील विरोधी संघाच्या प्रेक्षकांना शांत करणे हा त्याच्यासाठी सर्वात समाधानाचा क्षण आहे, असं कमिन्सने सांगितलं.

जन्म कुठे झाला? (Pat Cummins Birth and Family)
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट्रिक जेम्स कमिन्स हा पॅट कमिन्स म्हणून ओळखला जातो. त्याचा जन्म 8 मे 1993 रोजी वेस्टमीड, सिडनी येथे झाला. पॅट कमिन्सच्या वडिलांचं नाव पीटर कमिन्स (Peter Aummins) आहे. तर आईचं नाव मारिया कमिन्स (Maria Cummins) होतं, त्यांचं दीर्घ आजारानंतर 10 मार्च 2023 रोजी निधन झालं. पॅट कमिन्सला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत.

 

क्रिकेटची सुरुवात (Pat Cummins Cricket Career)
कमिन्सला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. माजी क्रिकेटपटू ब्रेट ली (Brett Lee) ला ला कमिन्स आपला आदर्श मानतो. 16 व्या वर्षी त्याने प्रतम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. कमिन्सने वयाच्या 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. कमिन्स उजव्या हाताचा फलंदाज असून उजव्या हाताचा वेगवान गोलंदाजही आहे. तो ऑस्ट्रेलियन संघाचा प्रमुख गोलंदाजअसून गरज पडेल तेव्हा चांगली फलंदाजी करू शकतो.

(Pat Cummins International Debut)
कॉलेजमध्ये कमिन्स एलिट अॅथलीट प्रोग्राम स्कॉलर होता. तो ग्लेनब्रुक ब्लॅक्सलँड क्रिकेट क्लबमध्ये ज्युनियर स्तरावरील क्रिकेट खेळला आणि त्यानंतर 2010 मध्ये पेनरिथसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला. 3 ते 5 मार्च 2011 पर्यंत, होबार्ट येथे तस्मानिया विरुद्ध न्यू साउथ वेल्स हे त्याचे प्रथम श्रेणी पदार्पण केलं. 13 फेब्रुवारी 2011 रोजी, सिडनी येथे न्यू साउथ वेल्स विरुद्ध क्वीन्सलँड A लिस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी (Pat Cummins Cricket Career)
11 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 25.41 च्या सरासरीने 305 धावा केल्या असून आणि सरासरी- 25.95 च्या सरासरीने 46 विकेट गमावल्या. 39 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 12 च्या सरासरी 144 धावाठोकल्या आणि 28.45 च्या सरासरीने 64 विकेट्स मिळवल्या. 2019 मध्ये, तो ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा उपकर्णधार बनला. 29 फेब्रुवारी 2020 रोजी, त्याने 100 एकदिवसीय विकेट पूर्ण केल्या. कमिन्स 2020-21 बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेत 21 बळींसह आघाडीवर विकेट घेणारा गोलंदाज होता आणि त्याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. पॅट कमिन्स 26 नोव्हेंबर 2021 रोजी ऑस्ट्रेलियाचा 47 वा कसोटी कर्णधार बनला. त्‍याने ऑस्‍ट्रेलियाचे नेतृत्व करत 2021-22 अॅशेस जिंकली.

पॅट कमिन्सची पत्नी (Pat Cummins Wife)
फेब्रुवारी 2020 मध्ये कमिन्सने मैत्रीण बेकी बोस्टन (Becky Boston) सोबत लग्न केलं. त्यांनी 1 ऑगस्ट 2022 रोजी लग्न केले. या जोडप्याला एक मुलगा असून त्याचं नाव अल्बी (Albie Boston Cummins) आहे.

हे ही वाचा:

CRIME: सायबर चोराकडून डॉक्टरांची फसवणूक

प्रत्येक पुरुषांनीही हा चित्रपट पाहायला हवा, राज ठाकरे, १०० रुपये तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss