Saturday, April 20, 2024

Latest Posts

World Test Championship Final मध्ये द मेन इन ब्लू भिडणार बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी

भारताच्या त्याचबरोबर जगामधील सर्वच क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल ते म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे. भारताचा संघ दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे.

भारताच्या त्याचबरोबर जगामधील सर्वच क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल ते म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे. भारताचा संघ दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लंडनमधील ओव्हल स्टेडियम मध्ये खेळवण्यात येणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरु व्हायला काही तासच शिल्लक राहिले आहेत. ७जुने पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल २०२३ मध्ये टीम इंडिया बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. द मेन इन ब्लू चे एकच लक्ष असणार आहे ते म्हणजेच हे सर्व महत्वाचे सामने जिंकून बहुप्रतिक्षित ICC विजेतेपदाकडे लक्ष्य असणार आहे. नुकताच ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेतली आहे. त्याचबरोबर भारताला केएल राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह काही प्रमुख खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे हे खेळाडू भारतीय संघांमध्ये खेळू शकणार नाहीत.

नुकताच इंडियन प्रीमियर लीगचा सिझन पार पडला आणि विदेश खेळाडूबरोबरच भारतीय खेळाडूंनी सुद्धा आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे तर दुसऱ्या क्रमांकावर भारताचा संघ आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांचा संघ निवडलेला आहे त्यामध्ये खेळाचे काही सुपरस्टार आहेत. ऑस्ट्रेलिया संघांचे ध्येय असेल की कोणत्याही खेळाच्या परिस्थितीत भरभराट होऊ शकेल असा संघ एकत्र करणे. ऑस्ट्रेलिया संघाने संघ निवडताना तीन वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटू आणि अत्यंत आक्रमक मधल्या फळीतील फलंदाजांचा समावेश आहे.

भारताच्या संघामध्ये फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे प्रमुख खेळाडू असणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवून भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम ठेवल्यामुळे या दोघांनी वर्चस्व राखले. परंतु ७ जूनपासून इंग्लंड मधील ओव्हल स्टेडियममध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सेट अत्यंत वेगळ्या परिस्थितीत खेळला जाणार असल्याने त्यांची निर्णायक निवड निश्चित नाही.

हे ही वाचा:

Odisha Train Accident मध्ये बचावलेल्या नागरिकांसाठी Reliance Foundation चा हातभार

Rahul Gandhi म्हणाले, एकीकडे Mahatma Gandhi, तर दुसरीकडे Nathuram Godse…

Watch Video, Odisha Train Accident नंतर तब्ब्ल ५१ तासानंतर पहिली ट्रेन धावली, अन् रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss