Friday, April 19, 2024

Latest Posts

IPLचा अंतिम सामना रद्द झाल्यामुळे हे चार खेळाडू इंग्लंडला पोहोचू शकणार नाहीत

आयपीएल २०२३ चा आजचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये आजची अंतिम लढत पाहायला मिळणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना आज राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे.

आयपीएल २०२३ चा आजचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये आजची अंतिम लढत पाहायला मिळणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना आज राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. आयपीएल २०२३ चा फायनलचा सामना लांबल्यामुळे टीम इंडियाच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ७ जून पासून सुरु होणार आहे. हे सामने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणार आहेत. आयपीएल २०२३ च्या नंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यासाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरु आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साठी बरेच भारतीय खेळाडू लंडनला पोहोचले आहेत. शुभमन गिल, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि अजिंक्य रहाणे हे सुद्धा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या संघात असणार आहेत. परंतु आयपीएल २०२३ चा अंतिम सामन्याला उशीर झाल्यामुळे हे चार खेळाडू अजूनही इंग्लंडला पोहोचले नाहीत. त्यामुळे भारतीय संघाचे नुकसान होणार आहे. शुभमन गिल, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा यांची लंडनची तिकिटे बुक करण्यात आली आहेत. गुजरातमधील पावसामुळे आयपीएल २०२३ चा अंतिम सामना रद्द करण्यात आला आणि तो सामना राखीव दिवशी ठेवण्यात आला त्यामुळे हे चार खेळाडू ठरवलेल्या दिवशीही इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होऊ शकणार नाही.

असे सांगण्यात येत आहे की, दोन दिवस हे खेळाडू इंग्लंडला उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. बरेच खेळाडू इंग्लंडला लवकर रवाना झाले आहेत त्यांचा सराव सुरु झाला आहे. आयपीएलचा अंतिम सामना ठरलेल्या वेळेवर रद्द झाल्यामुळे खेळाडू कसोटी सामन्याच्या सरावासाठी इंग्लंडला वेळेवर पोहोचू शकणार नाहीत.

हे ही वाचा:

IPL २०२३ च्या फायनलला वरुणराजाची उपस्थिती ; वादळी वाऱ्यासह आगमन

IPL 2023 Final, आज रंगणार महामुकाबलाचा थरार… कोण पटकवणार IPL 2023 मान? जाणून घ्या सविस्तर माहिती

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss