India vs Australia Border Gavaskar Trophy 2024 : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 साठी क्रिकेट विश्वात उत्साह वाढत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यावेळीही विराट कोहली ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना तंबी देणार का, याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे. बरं, मालिका सुरू होण्याआधी जाणून घ्या, समालोचनासाठी कोणती नावं मंजूर झाली आहेत.
२२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे पहिली कसोटी खेळली जाणार असून, त्यासाठी मॅथ्यू हेडन, रवी शास्त्री, सुनील गावस्कर, वसीम अक्रम, मुरली विजय, रसेल अरनॉल्ड आणि मार्क निकोल्स यांची इंग्लिश कॉमेंट्री सांभाळण्यासाठी निवड करण्यात आली आहे. हिंदी कॉमेंट्रीची जबाबदारी रवी शास्त्री, वसीम अक्रम, चेतेश्वर पुजारा, सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, जतीन सप्रू आणि दीप दास गुप्ता यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
इंग्लिश समालोचक – मॅथ्यू हेडन, रवी शास्त्री, सुनील गावस्कर, वसीम अक्रम, मुरली विजय, रसेल अरनॉल्ड आणि मार्क निकोल्स.
हिंदी समालोचक – रवी शास्त्री, वसीम अक्रम, चेतेश्वर पुजारा, सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, जतीन सप्रू आणि दीप दास गुप्ता.
आत्तापर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियन भूमीवर कांगारू संघाविरुद्ध एकूण ५२ सामने खेळला आहे, त्यापैकी टीम इंडियाला फक्त ९ वेळा विजय मिळवता आला आहे. तर ऑस्ट्रेलियाने ३० वेळा विजय मिळवला असून १३ सामने अनिर्णित राहिले आहेत. ऑस्ट्रेलियाला आपल्या घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या गेल्या १० सामन्यांमध्ये केवळ दोनदाच भारताला हरवता आले आहे. टीम इंडियाने चार वेळा विजय मिळवला आहे, तर चार सामने अनिर्णित राहिले. टीम इंडिया गेली चार वेळा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकत आहे हे देखील एक रंजक सत्य आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक
- पहिली कसोटी (पर्थ): २२-२६ नोव्हेंबर
- दुसरी कसोटी (ॲडलेड): ६-१० डिसेंबर
- तिसरी कसोटी (ब्रिस्बेन): १४-१८ डिसेंबर
- चौथी कसोटी (मेलबर्न): २६-३० डिसेंबर
- पाचवी कसोटी, सिडनी : ३-७ जानेवारी
हे ही वाचा:
Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान