Thursday, April 25, 2024

Latest Posts

यंदाच्या IPL 2023 मधील खेळाडूंवर पैशांची उधळण

इंडियन प्रीमियर लीग २०२३ (Indian Premier League 2023) चा अंतिम सामना काल पार पडला. कालचा सामना हा अत्यंत रोमांचक होता.

इंडियन प्रीमियर लीग २०२३ (Indian Premier League 2023) चा अंतिम सामना काल पार पडला. कालचा सामना हा अत्यंत रोमांचक होता. कालचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Chennai Super Kings vs Gujarat Titans) या दोन संघांमध्ये रंगला होता. या अंतिम सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली आणि इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. मागील वर्षाच्या विजेत्या संघाला पराभूत करून चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. चेन्नईचे खेळाडू गुजरात टायटन्सच्या खेळाडूवर चांगलेच भारी पडले आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या ऑरेंज कॅप दिली जाते. तर सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. यंदाच्या सीझनमध्ये ऑरेंज कॅप (Orange cap) आणि पर्पल कॅपवर (Purple Cap) कब्जा गुजरात टायटन्सच्या संघाने केला आहे. गुजरातचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने (Shubhman gill) यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. शुभमन गिलने १७ सामन्यांमध्ये ८९० धावा केल्या आहेत. त्याच बरोबर पर्पल कॅपवर सुद्धा पहिल्या तीन मध्ये गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा बोलबाला आहे.

यंदाची पर्पल कॅप गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने जिंकली आहे. मोहम्मद शमीने १७ सामन्यामध्ये २८ विकेट्स घेतले आहेत. त्याचबरोबर मोहित शर्मा आणि राशिद खानने प्रत्येकी २७-२७ विकेट्स घेतले आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या विजेत्या संघ चेन्नई सुपर किंग्सला २० कोटी रुपये बक्षीस मिळाले आहे. फायनलच्या सामन्यामध्ये पराभूत झालेल्या म्हणजेच उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपये मिळाले आहेत. त्याचबरोबर ऑरेंज कॅप विजेता गुजरात टायटन्सचा खेळाडू शुभमन गिलला १५ लाख रुपये बक्षिस देण्यात आले आहे. गुजरात टायटन्सच्या पर्पल कॅप विजेत्या मोहम्मद शमीला बक्षीस म्हणून १५ लाख रुपये मिळाले आहे.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

“आदिपुरुष” चित्रपटातील गाणे झाले रिलीज, प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss