spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

U19 Women Asia Cup Final 2024: नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने, यंदा जेतेपदावर नाव कोण कोरणार?

भारत आणि बांग्लादेश यांच्यात अंडर १९ आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. आशिया कप स्पर्धेत गेल्या काही वर्षात बांगलादेशचा संघ भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. नुकतंच भारत आणि बांग्लादेश पुरुष संघ अंतिम फेरीत भिडले होते. तेव्हा बांगलादेशने जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता महिला संघ आमनेसामने असून कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल हा बांगलादेशच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. साखळी फेरीत पाकिस्तानला ९ विकेट आणि ७३ चेंडू राखून पराभूत केलं. तर नेपाळविरुद्धचा सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. त्यामुळे भारताला सुपर ४ मध्ये स्थान मिळालं. सुपर ४ मध्ये भारताने बांग्लादेश आणि श्रीलंकेला पराभूत केलं आणि अंतिम फेरी गाठली. तर बांगलादेशने नेपाळ पराभूत करत अंतिम फेरी गाठली.

दोन्ही संघांची प्लेइंग ११ –

भारताचा संघ : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके, जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकीपर), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, आयुषी शुक्ला, एमडी शबनम.

बांगलादेशचा संघ : सुमैया अक्तर (कर्णधार), सुश्री इवा, फाहोमिदा चोया, हबीबा इस्लाम पिंकी, जुएरिया फिरदौस, फरजाना इस्मिन, अनिसा अक्टर सोबा, सुमैया अक्तर सुबोर्णा, निशिता अक्टर निशी, जनाना मौआ, सादिया अक्तर.

दोन्ही संघाचे खेळाडू :

भारत महिला अंडर १९ संघ – निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके, जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकीपर), भाविका अहिरे (विकेटकीपर), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी धृती, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम, नंदना एस.

बांगलादेश महिला अंडर १९ संघ – सुमैया अक्टर (कर्णधार), आफिया अशिमा एरा, सुश्री इवा, फाहोमिदा चोया, हबीबा इस्लाम पिंकी, जुएरिया फिरदौस, फरिया अक्टर, फरजाना इस्मिन, अनिसा अक्टर सोबा, सुमैया अक्तर सुबोर्णा, निशिता अक्टर निशी, अरविन तानी, जनाना मौआ, सादिया अक्तर, महारुण नेसा

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss