Thursday, April 18, 2024

Latest Posts

विराट कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साठी ENGLAND ला रवाना

टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपसाठी (WTC Final 2023) सज्ज होताना दिसत आहे.

टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपसाठी (WTC Final 2023) सज्ज होताना दिसत आहे. IPL २०२३ च्या चुरशीतून बाहेर पडल्यानंतर कोणत्याही क्षणाचा विलंब न करता RCBसंघाचा कर्णधार विराट कोहली हा आपली पत्नी आणि बॉलिवूड क्षेत्रातली अनुष्का शर्मा हे दोघंही इंग्लंडला रवाना झाले आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आज मुंबईतून इंग्लंडसाठी रवाना झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा फोटो व्हायरल झालाय.

आरसीबीचे आयपीएलमधील आव्हान काही झेलत आले नाही आणि त्यांनी यावर्षीचा IPL २०२३ च्या वर्षात त्यांनी शरणागती पत्करली आणि त्यानंतर लगेच येणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी इंग्लंडला रवाना झालाय. विराट कोहलीशिवाय मोहम्मद सिराजही इंग्लंडला रवाना झालाय. सिराज हैदराबाद विमानतळाहून इंग्लंडकडे रवाना झाला आहे. सिराजने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली.आता विराट कोहली मात्र येणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी कॅनॉट नवीन प्रयत्न करायचे आहरेत कोणत्या नवीन योजना आखणार आहेत तसेच जिंकण्यासाठी कोणती नवी रणनीती आखावी लागणार आहे या काकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचं म्हंटल जात आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ‘द ओव्हल’ येथे खेळवण्यात येणार आहे.७ जून, २०२३ पासून सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे संघ ठरले, ठिकाण ठरलं आणि दिवसही ठरला, फक्त आता विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारतीय संघ तीन बॅचमध्ये लंडनमध्ये दाखल होणार आहेत. पहिली बॅच आज रवाना झाली आहे. विराट कोहली दोन आठवडे सराव करणार आहे. तर पहिल्या बॅचमध्ये विराट कोहलीसह रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव हे प्रमुख खेळाडू असतील. विराट कोहली आणि मोहम्मद सिराज रवाना झाल्याचे समोर आल्यानंतर इतर खेळाडूंबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ते खेळाडू आजच रवाना होणार असल्याचं समजलं जात आहे. Team India च्या टीममध्ये रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर, मोहमद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर) अशी टीम असणार आहे तर Team Australia या टीममध्ये पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश असणार आहे.

हे ही वाचा:

कोणता संघ होणार ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर? | Which team will be out of the trophy race? | MI VS LSG

MI vs LSG, जाणून घ्या एलिमिनेटर सामन्याची प्लेइंग ११, मुंबई विरुद्ध लखनौ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss