spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

Virat Kohli चे पर्थमध्ये तडाखेदार शतक; तेंडुलकरचा केला महारेकॉर्ड ब्रेक

विराट कोहलीने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी पार्थ स्टेडियममध्ये शतक झळकावलं आहे. विराटच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३० वे तर ८१ वे आंतरराष्ट्रीय शतक ठरलं आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. अशातच विराट कोहलीने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी पार्थ स्टेडियममध्ये शतक झळकावलं आहे. विराटच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३० वे तर ८१ वे आंतरराष्ट्रीय शतक ठरलं आहे. विराटने या शतकासह दिग्गज सचिन तेंडुलकर यांचा शतकांचा महारेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच विराटच्या या शतकानंतर कर्णधार जसप्रीत बुमराह याने भारताचा दुसरा डाव हा १३४.३ षटकांमध्ये ६ बाद ४८७ धावांवर घोषित केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर आता ५३४ धावांचं आव्हान आहे.

भारताच्या दुसऱ्या डावात विराटने १४३ बॉलमध्ये ६९.९३ च्या स्ट्राईक रेटने ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. विराटच्या कसोटी कारकिर्दीतील हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचं एकूण ८ वे तर ऑस्ट्रेलियातील ७ वे शतक ठरलं. विराट कोहलीने सचिन तेंडुलकर याचा भारतीय फलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. विराट आता ऑस्ट्रेलियात टीम इंडियाकडून सर्वाधिक शतक करणारा पहिला तर एकूण दुसरा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम हा इंग्लंडच्या जॅक होब्बस याच्या नावावर आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

भारत: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह (क), मोहम्मद सिराज/हर्षित राणा.

ऑस्ट्रेलिया: उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (क), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

हे ही वाचा:

Match Preview India vs Australia Virat Kohli च्या धावांचा दुष्काळ संपणार का ?

शरद पवारांचा गड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने मारली बाजी तब्बल इतक्या जागांवर मिळवला विजय…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss