Thursday, April 25, 2024

Latest Posts

काय म्हणाला केएल राहुलच्या दुखापतीवर सासरा सुनील शेट्टी

सध्या सगळीकडे आयपीएल २०२३ चा (IPL 2023) फिवर पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंना दुखापत झाली आहे.

सध्या सगळीकडे आयपीएल २०२३ चा (IPL 2023) फिवर पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंना दुखापत झाली आहे. त्यातीलच एक म्हणजेच भारताचा क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुल (KL Rahul). केएल राहुल याला मैदानामध्ये सामना खेळताना त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. केएल राहुल याच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मधून बाहेर गेलेल्या केएल राहुलवर आज शस्त्रक्रिया पार पडणार आहे. त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे तो आयपीएलचे राहिलेले सामने खेळू शकणार नाही. शिवाय तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) सुद्धा खेळू शकणार नाही. आज त्याच्या मादीला झालेल्या दुखापतीची शस्त्रक्रिया पार पडणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करताना भारतीय संघाचा खेळाडू केएल राहुल जखमी झाला होता. राहुलच्या दुखापतीवर त्याची पत्नी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि सासरे म्हणजेच अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) हे चिंतेत आहेत. यावर सुनील शेट्टी म्हणाला की, राहुलवर ९ मे रोजी शस्त्रक्रिया होणार आहे. त्याला आपल्या सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे. भारतीय क्रिकेट संघामध्ये अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि ते सगळेच सक्षम आहेत. माझ्या मते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील दुसऱ्या खेळाडूंसाठी ही संधी आहे. याशिवाय कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नसतो असे सुनील शेट्टी म्हणाला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिप ७ जून पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनलला सुरुवात होणार आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारताने आपल्या टीमची घोषणा केली आहे. काही खेळाडू इंग्लंडमध्ये सराव करत आहेत तर काही खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आणि भारताचे अनेक खेळाडूंना दुखापत झाली आहे.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss