Saturday, April 20, 2024

Latest Posts

काय असे दोन्ही संघांची अंतिम सामन्याची Playing 11?

आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये आजचा शेवटचा सामना रंगणार आहे. आजचा हा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवण्यात येणार आहे.

आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये आजचा शेवटचा सामना रंगणार आहे. आजचा हा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवण्यात येणार आहे. आज सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष हे इंडियन प्रीमियर २०२३ च्या अंतिम सामान्याकडे असणार आहे. आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Chennai Super Kings vs Gujarat Titans) या दोन संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. गुजरात टायटन्सचा संघ मागील वर्ष विजेता ठरला आहे तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएलच्या इतिहासात चार विजेता संघ आहे. गुजरात समोर चेन्नई कोणते नवे आव्हान उभे करेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.

टी-२० फॉरमॅटचा एमएस धोनीला (MS Dhoni) किंग मानले जाते. त्यामुळे आज चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्यासमोर (Hardik Pandya) कोणती रणनीती आखेल याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल. त्याचवरोवर मागील वर्षाचा गतविजेता संघ गुजरात टायटन्सची काय नवी रणनीती असणार आहे हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दोन महिन्यापासून सुरु असलेल्या आयपीएल रनसंग्राम आज संपणार आहे. दहा संघामध्ये आयपीएलच्या चषकासाठी स्पर्धा रंगली होती. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायन्स आणि धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स अंतिम सामन्यामध्ये आमने सामने असणार आहेत.

चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेइंग ११ –

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रवींद्र जडेजा , शिवम दुबे , एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर) , दिपक चहर , तुषार देशपांडे , एम पथीराणा

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग ११ –

शुभमन गिल , हार्दिक पांड्या (कर्णधार ) , साई सुदर्शन , डेव्हिड मिलर , विजय शंकर , राहुल तेवतिया , वृद्धिमान साहा (विकेटकीपर) , राशिद खान , मोहमद शमी , एमएम शर्मा , नूर अहमद

हे ही वाचा:

IPL २०२३ च्या फायनलला वरुणराजाची उपस्थिती ; वादळी वाऱ्यासह आगमन

IPL 2023 Final, आज रंगणार महामुकाबलाचा थरार… कोण पटकवणार IPL 2023 मान? जाणून घ्या सविस्तर माहिती

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss