Saturday, April 20, 2024

Latest Posts

CSK चा कोणता फलंदाज वरचढ आणि कोणत्या गोलंदाजांची कामगिरी दमदार, CSK चा आयपीएल २०२३ चा प्रवास

एमएस धोनीचा (MS Dhoni) संघ चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सर्वात आधी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. मागील वर्षांमध्ये चेन्नईचा संघ आयपीएल च्या गुणतालिकेमध्ये नवव्या क्रमांकावर होता.

एमएस धोनीचा (MS Dhoni) संघ चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सर्वात आधी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. मागील वर्षांमध्ये चेन्नईचा संघ आयपीएल च्या गुणतालिकेमध्ये नवव्या क्रमांकावर होता. यंदाच्या सीझनमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीसोबत दमदार फिल्डिंग करून चेन्नई सुपर किंग्सने अंतिम फेरीमध्ये आपले स्थान सर्वात आधी निश्चित केले. त्याबरोबर एमएस धोनीचे नेतृत्व चेन्नईच्या संघाचा एक्स फॅक्टर आहे. यावर्षी चेन्नई सुपर किंग्सची सलामी जोडी ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे या दोघांची जोडी हिट ठरली. तर चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतले आहेत. रविंद्र जाडेजा याने अष्टपैलू खेळीने सर्वांची मने जिंकली आहेत

चेन्नई सुपर किंग्सची सलामी जोडी तर हिट आहेच परंतु त्याचबरोबर चेन्नई शिवम दुबे या संघासाठी मिळालेला बोनस खेळाडू आहे. शिवम दुबेने या सीझनमध्ये गोलंदाजाला चांगलाच कोप दिला आहे. डेवेन कॉनवे याने १४ सामन्यांमध्ये ६२५ धावा केल्या आहेत. तर ऋतुराज गायकवाड याने १४ सामन्यामध्ये ५६४ धावा काढल्या आहेत. डेवेन कॉनवेने आतापर्यत या सीझनमध्ये सहा अर्धशतके झळकावली आहेत. या सीझनमध्ये शिवम दुबेने आतापर्यत ३३ षटकार ठोकले आहेत. तर ऋतुराज गायकवाड याने २९, कॉनवेने १६, अजिंक्य रहाणेने १४ आणि धोनीने १० षटकार मारले आहेत.

अनुभवी वेगवान गोलंदाज दीपक चाहर सुरुवातीच्या सामाने खेळू शकला नाही. त्यामुळे तेव्हा चेन्नई संघासाठी तुषार देशपांडेने दमदार कामगिरी करून संघासाठी विकेट्स काढले. तुषार देशपांडे याने आतापर्यत संघासाठी २१ विकेट्स घेतले आहेत. तुषार देशपांडे याला मथिशा पथिराणा याने चांगली साथ दिली आहे. मथिशा पथिराणा याने संघासाठी ११ सामन्यांमध्ये १७ विकेट्स घेतले आहेत. दीपक चाहर याने दुखापतीनंतर संघामध्ये पुनरागमन केले आणि चाहर याने ९ सामन्यांमध्ये १२ विकेट्स घेतल्या. चेन्नईचा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने १९ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजाला महेश तिक्ष्णाची उत्तम साथ मिळाली. तिक्ष्णा याने ११ विकेट्स घेतले आहेत. विंद्र जाडेजा आणि तिक्ष्णा यांनी विकेट घेण्यासोबत धावाही रोखल्या आहेत. मोईन अली ने ९ विकेट्स घेतले आहेत.

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

Gujrat Titans ला मिळवून दिले शुभमन गिल आणि मोहित शर्माने अंतिम फेरीचे तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss