Friday, April 19, 2024

Latest Posts

IPL2023, पर्पल कॅपवर आणि ऑरेंज कॅपवर कोणत्या खेळाडूचे नाव कोरले जाणार?

इंडियन प्रीमियर लीगचा २०२३ (2023 of Indian Premier League) चा हा सिझन अत्यंत रोमांचक होत चालला आहे. आयपीएलचा या सीझनचा हा शेवटचा टप्पा सुरु आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा २०२३ (2023 of Indian Premier League) चा हा सिझन अत्यंत रोमांचक होत चालला आहे. आयपीएलचा या सीझनचा हा शेवटचा टप्पा सुरु आहे. आयपीएलचे चाहते आणि क्रिकेट चाहते नेहमीचे आयपीएलमधील आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट तर करत असतातच त्यांचे आपल्या आवडत्या संघाचा विजय पराभवाकडे लक्ष तर असते परंतु कोणता खेळाडू सर्वाधिक धावा करतो कोणता खेळाडू सर्वाधिक विकेट्स घेतो याकडे सुद्धा त्यांचे लक्ष असते. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप (Orange cap) दिली जाते आणि सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप (Purple Cap) दिली जाते. सध्या कोणत्या खेळाडूंकडे कोणती कॅप आहे आणि कोणते खेळाडू ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत आहेत ते पाहूया.

सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगरुळूचा कर्णधार फाफ डू प्लेसीकडे ऑरेंज कॅप कायम आहे. फाफ डू प्लेसीने आतापर्यत १२ सामन्यांमध्ये ६३१ धावा करून ऑरेंज कॅपवर आपले वर्चस्व गाजवले आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने १३ सामन्यांमध्ये ५७६ धावा केल्या आहेत. तर राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जैस्वाल तिसऱ्या क्रमांकावर आहे. यशस्वीने आतापर्यत एकूण १३ सामने खेळले आहेत त्यामध्ये त्याने ५७५ धावा केल्या आहेत. त्यांच्या मागोमाग चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर फलंदाज डेवोन कॉनवे चौथ्या क्रमांकावर आहे त्याने १३ सामन्यांमध्ये ४९८ धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव आहे. सूर्यकुमार यादवने १३ सामन्यांमध्ये ४८६ धावा केल्या आहेत.

आयपीएल मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते या शर्यतीत अव्वल स्थानावर गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आता पर्यत १३ सामन्यांमध्ये २३ विकेट्स घेतले आहेत. त्याचा सहकारी गुजरात टायटन्सचा फिरकी गोलंदाज राशिद खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. राशिदने आतार्पयत २३ गडी बाद करण्यात यश मिळाले आहे. राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने २१ विकेट्स घेतले आहेत आणि तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर मुंबई इंडिअन्सचा गोलंदाज पियुष चावला चौथ्या क्रमांकावर आहे तर कोलकाता नाइट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती पाचव्या क्रमांकावर आहे. पियुष चावलाने २० विकेट्स घेतले आहेत आणि वरुण चक्रवर्तीने १९ गडी बाद केले आहेत. आयपीएलचा शेवटचा टप्पा सुरु आहे आणि कोणता खेळाडू इंडियन प्रीमियर लीग २०२३ पर्पल कॅपवर आणि ऑरेंज कॅपवर नाव करेल या कडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss